टोकियो Earthquake in Japan : जपानमध्ये भूकंपाच्या हादऱ्यानं सोमवारी आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपात इमारती, वाहनं आणि बोटींचं प्रचंड नुकसान झालं आहे. सोमवारी दुपारी हा भूकंप झाला असून जापानला 7.6 रिश्टल स्केलचा धक्का बसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. जपानमध्ये भूकंप होण्याच्या शक्यतेनं नागरिकांनी मंगळवारी घरांपासून दूर राहण्याचं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे. जपानच्या काही भागात भूकंपाचा धक्का बसण्याची शक्यता असल्यानं हा इशारा देण्यात आल्याचं या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
भूकंपात 8 नागरिकांचा मृत्यू : जपानमध्ये सोमवारी झालेल्या भूकंपात वाजिमा शहरात आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपात नागरिकांच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या भूकंपात सात नागरिक गंभीर जखमी झाल्याचंही जपानच्या अधिकाऱ्यांनी यावेळी वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
नागरिकांचा जीव वाचवणं प्राधान्य : जपानच्या वाजिमा शहरात झालेल्या भूकंपात 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त स्थानिक वृत्तसंस्थेनं दिली आहे. भूकंप झाल्यामुळं जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी याबाबत माहिती देताना "नागरिकांचा जीव वाचवणं हे आमचं प्राधान्य आहे. आम्ही भूकंपाविरोधात लढा देत आहोत. घरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढणं गरजेचं आहे" असं त्यांनी वृत्तसंस्थेला बोलताना सांगितलं. विशेष म्हणजे पंतप्रधान फुमियो किशिदा हे बोलत असताना जपानला 5.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. "नागरिकांना वाचवण्यासाठी जपान सरकारनं आपत्तीग्रस्त परिसरात 1 हजार सैनिक पाठवले आहेत. त्यामुळं घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे" असंही जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी यावेळी स्पष्ट केलं.
घरं कोसळली, जहाजं अर्धवट बुडाली : जपानमध्ये आलेल्या भूकंपामुळं घरांच्या रांगा कोसळताना व्हिडिओतून पुढं आलं आहे. तर जहाजं खाड्यांमध्ये अर्धवट बुडाली आहेत. त्यासह लाकडांचं बांधकाम असलेली घरं सपाट झाली आहेत. त्यावरुन जपानमध्ये भूकांपानं किती नुकसान झालं, याची प्रचिती येते.
जापानमध्ये त्सुनामीचा इशारा : जपानच्या हवामान विभागानं सोमवारी जपानमध्ये त्सुनामीचा इशारा दिला आहे. इशीकावा आणि जपानच्या पश्चिम किनाऱ्याला हा त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. त्सुनामीचा धोका असल्यानं समुद्रात तीन मिटरच्या लाटा उठणार असल्याचंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. जपानमध्ये मोठा भूकंप झाल्यानं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी "जपानच्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रशासन तयार आहे" असं त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :