टोकीयो Earthquake in Japan : जपान पुन्हा एकदा मोठ्या भूकंपानं हादरलाय. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिथं तब्बल 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झालीय. या भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन त्सुनामीचा इशाराही देण्यात आलाय.
-
Earthquake of Magnitude 7.2 on the Richter Scale strikes near West Coast of Japan: National Center for Seismology pic.twitter.com/y2nzmqiF3U
— ANI (@ANI) January 1, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Earthquake of Magnitude 7.2 on the Richter Scale strikes near West Coast of Japan: National Center for Seismology pic.twitter.com/y2nzmqiF3U
— ANI (@ANI) January 1, 2024Earthquake of Magnitude 7.2 on the Richter Scale strikes near West Coast of Japan: National Center for Seismology pic.twitter.com/y2nzmqiF3U
— ANI (@ANI) January 1, 2024
लाटा 5 मीटर उंच उसळण्याची शक्यता : जपान मेटोलॉजिकल एजन्सीनं (जेएमए) दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम जपानमधील इशिकावा प्रांतात शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले. जपानच्या एका माध्यमानं सांगितलं की, निगाटा, टोयामा, यामागाटा, फुकुई आणि ह्योगो प्रीफेक्चरमध्ये जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. हवामान खात्याशी संबंधित जपानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनामीमुळं समुद्राच्या लाटा 5 मीटर उंचीपर्यंत उसळू शकतात. त्यामुळं लोकांना लवकरात लवकर उंच जमिनीवर किंवा जवळच्या इमारतीच्या छतावर जाण्याचं आवाहन करण्यात आलंय.
जपानमध्ये उसळल्या त्सुनामीच्या लाटा : जपानमध्ये स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 4:21 वाजता सुनामीचा इशारा देण्यात आलाय. यानंतर तोयामा प्रीफेक्चरमध्ये 4:35 वाजता 80 सेंटीमीटरच्या लाटा किनारपट्टीवर आदळल्या आणि त्यानंतर 4:36 वाजता लाटा निगाता प्रांतात पोहोचल्या. यापूर्वी 28 डिसेंबरलाही जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. जपानच्या कुरिल बेटांवर झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, अर्ध्या तासात इथं भूकंपाचे दोन धक्के जाणवले होते.
भूकंपाचे चार प्रकार : भूकंपाचे चार प्रकार आहेत. पहिला प्रेरित भूकंप म्हणजेच मानवी क्रियाकलापांमुळे जे भूकंप होतात. जसं बोगदे खोदणं, कोणतेही जलस्रोत भरणे किंवा कोणत्याही प्रकारचे मोठे भूगर्भीय किंवा भूऔष्णिक प्रकल्प बांधणे. धरणं बांधल्यामुळंही भूकंप होतात. दुसरा ज्वालामुखी भूकंप म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी किंवा नंतर होणारे भूकंप, हे भूकंप गरम लाव्हा सोडल्यामुळं आणि त्याचा पृष्ठभागाखालील प्रवाह यामुळे होतात. तिसरा संकुचित भूकंप आहे, म्हणजे लहान भूकंप जे जमिनीच्या आत असलेल्या गुहा आणि बोगदे फुटल्यामुळं तयार होतात. भूगर्भात होणाऱ्या छोट्या स्फोटांमुळेही ते येतात. चौथा प्रकार म्हणजे स्फोट भूकंप, या प्रकारचा भूकंप अणुस्फोट किंवा रासायनिक स्फोटामुळे होतो.
हेही वाचा :