ETV Bharat / international

Stormy Daniels Case : पॉर्न स्टारला पैसे देण्याप्रकरणी दाखल होणार खटला, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले... - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पॉर्न स्टारला पैसे देण्याप्रकरणी त्यांच्या विरोधात खटला सुरु होऊ शकतो. यावर ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Donald Trump
डोनाल्ड ट्रम्प
author img

By

Published : Mar 31, 2023, 9:52 AM IST

Updated : Mar 31, 2023, 10:03 AM IST

न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावरील आरोपांना राजकीय छळवणूक आणि अमेरिकेच्या इतिहासातील निवडणुकीतील सर्वोच्च हस्तक्षेप, असे म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले की, याचा सध्याचे अध्यक्ष जो बायडन यांच्यावर मोठा परिणाम होणार आहे. मॅनहॅटनमधील एका ज्युरीने एका पॉर्न स्टारला गुपचूप पैसे देण्याच्या भूमिकेबद्दल ट्रम्प यांच्यावर आरोप ठेवण्यासाठी मतदान केले आहे. या प्रकरणी ट्रम्प यांच्याविरोधात येत्या काही दिवसांत खटला सुरू होण्याची शक्यता आहे.

'अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय छळ' : मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा वकील अ‍ॅल्विन एल. ब्रॅगसाठी काम करणारे वकील ट्रम्प यांना आत्मसमर्पण करण्यास आणि आरोपांना सामोरे जाण्यास सांगणार आहेत. या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा राजकीय छळ आहे. ते म्हणाले की, मी राष्ट्रपती होण्यापूर्वीच माझ्याविरुद्ध जादूटोणा सुरू झाला होता.

'डेमोक्रॅट्सने माझ्यावर खोटे आरोप केले' : ट्रम्प यांनी हे सर्व कट्टर डावे डेमोक्रॅट्स करत असल्याचा आरोप केला आहे. ते या देशातील कष्टकरी स्त्री - पुरुषांचे शत्रू आहेत, असे ते म्हणाले. हे सर्वजण 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' चळवळ उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. डेमोक्रॅट्सने माझ्यावर खटला चालवण्याच्या नादात खोटे आरोप केले, फसवणूक केली असे ते म्हणाले.

'सरकार गुन्हेगारी रोखू शकत नाही' : ते म्हणाले की, न्यूयॉर्क शहरातील गुन्हेगारी सध्या सर्वोच पातळीवर आहे. याला सरकार देखील रोखू शकत नाही. ते म्हणाले की, गुन्हे थांबवण्याऐवजी जो बायडनचे सरकार खून, चोरी व इतर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांनी त्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. ते म्हणाला की, त्यांना विश्वास आहे की हा जादूटोणा जो बायडन यांना महागात पडेल. कट्टरवादी डावे डेमोक्रॅट्स इथे काय करत आहेत हे अमेरिकन लोकांना खरोखरच कळते. प्रत्येकजण ते पाहू शकतो, असे ते शेवटी म्हणाले.

हेही वाचा : H 1B and L 1 Visa Reform - अमेरिकेतील भारतीयांच्या नोकऱ्यांवर येणार गंडांतर? एच1बी व्हिसा सुधारणा विधेयक सादर

Last Updated : Mar 31, 2023, 10:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.