ETV Bharat / international

Oath of Prime Minister : श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुणवर्धने यांची निवड - पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुणवर्धने यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी आज पंतप्रधान कार्यालय, फ्लॉवर रोड, कोलंबो येथे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ ( Dinesh Gunawardena took oath as PM ) घेतली.

Dinesh Gunawardena
दिनेश गुणवर्धने
author img

By

Published : Jul 22, 2022, 5:56 PM IST

कोलंबो: श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुणवर्धने यांची निवड करण्यात ( Dinesh Gunawardena elected Sri Lanka PM ) आली आहे. त्यांनी आज पंतप्रधान कार्यालय, फ्लॉवर रोड, कोलंबो येथे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ ( Dinesh Gunawardena took oath as PM ) घेतली. दिनेश गुणवर्धने हे खासदार आहेत. ते यापूर्वी कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. 2020 च्या संसदीय निवडणुकीनंतर त्यांची परराष्ट्र संबंध मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

याआधी गुरुवारी, देशाच्या आर्थिक संकटाच्या ( Economic crisis in Sri Lanka ) वेळी संसदेचे नेते दिनेश गुणवर्धने श्रीलंकेतील कोलंबो येथील बौद्ध मंदिरात ( Buddhist temple in Colombo ) पोहोचले. तेथे ते रानिल विक्रमसिंघे यांची वाट पाहत होते, ज्यांची संविधानानुसार आठवे कार्यकारी राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. श्रीलंका सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाची आर्थिक स्थिती इतकी बिघडली आहे की, लोक रस्त्यावर उतरले आणि तीव्र निषेध केला.

गोटाबाया यांनी देश सोडून पळ काढला आणि माजी राष्ट्रपती गोटाबाया यांच्या विरोधात जनक्षोभ आणि संतापाच्या पार्श्वभूमीवर राजकीय गोंधळाच्या वेळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे ( Prime Minister Ranil Wickremesinghe ) यांची काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यानंतर निवडणुकीतील विजयानंतर विक्रमसिंघे यांनी देशाची सत्ता हाती घेतली आहे. परंतु नवीन अध्यक्ष आणि त्यांच्या मंत्रिमंडळासमोरील आव्हाने स्पष्ट आहेत.

हेही वाचा - चीनमध्ये बँकेसमोर पाठवले रणगाडे : मोठा घोटाळा.. ग्राहकांचे आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.