नवी दिल्ली : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आतापर्यंत 4,890 लोकांचा मृत्यू झाला. 7.8-रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप या दशकातील सर्वात प्राणघातक भूकंप ठरण्याची शक्यता आहे. मंगळवार सकाळपर्यंत, तुर्कीमध्ये 3,381 लोकांची संख्या होती, तर सीरियामध्ये ती 1,509 पर्यंत वाढली. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, भूकंपाची वेळ, स्थान, फॉल्ट लाइन आणि कोसळलेल्या इमारतींचे कमकुवत बांधकाम यासह अनेक घटकांमुळे भूकंप इतका विनाशकारी होता, असे द स्ट्रेट टाईम्सने वृत्त दिले आहे.
1939 पासून तुर्कस्तानला आलेला सर्वात शक्तिशाली भूकंप : अहवालात म्हटले आहे की, तुर्की जगातील सर्वात सक्रिय भूकंप झोनमध्ये आहे. 1999 मध्ये, उत्तर तुर्कीच्या डुझेच्या प्रदेशात उत्तर अनाटोलियन फॉल्ट लाइनवर झालेल्या भूकंपात 17,000 हून अधिक लोक मारले गेले होते, असे अहवालात म्हटले आहे. ब्रिटीश जिओलॉजिकल सर्व्हेचे संशोधन सहकारी डॉ, रॉजर मुसन यांचे म्हणणे आहे की, ईस्ट ॲनाटोलियन फॉल्टने दोन शतकांमध्ये -7 तीव्रतेचा भूकंप अनुभवला नाही. ते पुढे म्हणाले की, शेवटचा मोठा भूकंप होऊन खूप वेळ झाला होता. खूप ऊर्जा तयार झाली असावी.
जगभरातून मदत : भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, दोन भारतीय आपत्ती निवारण पथकांपैकी पहिली तुकडी सोमवारी रात्री तुर्कीला रवाना झाली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी रात्री ट्विट करून शोक व्यक्त केला. त्यांनी सीरियाचे परराष्ट्रमंत्री फैसल मेकदाद यांच्याशी संपर्क साधत आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सोमवारी इराकचे पंतप्रधान मोहम्मद एस. अल-सुदानी यांनी घोषणा केली की, ते आपत्कालीन वैद्यकीय पुरवठा, प्रथमोपचार आणि निवारा पुरवठा तसेच औषध आणि इंधन पाठवतील. तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांनीही आपत्तीग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. जपानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या निवेदनानुसार, तुर्कीमधील भूकंपाला प्रतिसाद म्हणून जपानने देशाच्या आपत्ती निवारण बचाव पथकाला पाठवले आहे. नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीला अमेरिकेने देखील मदत जाहीर केली आहे. व्हाईट हाऊसने सांगितले की ते तुर्कीमध्ये मदत कार्यासाठी शोध आणि बचाव पथके पाठवत आहेत.
7,800 हून अधिक लोकांना वाचवले : बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या एन्क्लेव्हमध्ये शेकडो कुटुंबे ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. या क्षेत्रात युद्धामुळे देशाच्या इतर भागांतून विस्थापित झालेल्या सुमारे 4 दशलक्ष लोक राहतात. तसेच तुर्की हे आजूबाजूच्या देशांतील गृहयुद्धामुळे निर्वासित झालेल्या लाखो लोकांचे घर आहे. यातील अनेक निर्वासित पूर्वीच्या बॉम्बस्फोटांमुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमध्ये राहतात. तुर्कीच्या 10 प्रांतांमध्ये सुमारे 7,800 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे.
हेही वाचा : Eathquake Safety Tips : भूकंपापासून वाचण्यासाठी 'या' सेफ्टी टिप्स नेहमी ठेवा लक्षात