लंडन - रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक दावा करण्यात येतोय. ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 ने यासंदर्भात माहिती दिलीय. (Vladimir Putin Death News) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाल्याचा विश्वास ब्रिटनच्या वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान रशियातील सुत्रांनुसार पुतीन यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. युक्रेनसोबत युद्धविराम झाल्यानंतर त्यांची तब्येत बरी नव्हती. यानंतर पुतीन यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
जर पुतीन यांचा मृत्यू झाला असेल, तर सत्ता टिकवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ ही बातमी जाहीरच केली जाणार नाही, असे गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले. पुतीन यांचे नजीकच्या काळात मीडियात आलेले व्हिडीओ हे रेकॉर्डेड असल्याचेही मत गुप्तचर यंत्रणेनी व्यक्त केले आहे.
रशियाने युक्रेनसोबत युद्ध पुकारल्याने पुतीन यांच्या मृत्यूची बातमी लपवण्यासाठी त्यांच्या डुप्लिकेटचा वापर केल्याचा आरोप आहे. ब्रिटनच्या डेली स्टारने हे वृत्त दिल्यानंतर जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अन्य देशांच्या गुप्तचर यंत्रणाही या माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवत असून त्यातून महत्वाची माहिती हाती येऊ शकते.
अधिकृत माहितीनुसार सध्या पुतीन यांच्यावर उपचार सुरू आहेत. युक्रेनसोबत युद्ध सुरू असताना पुतीन माध्यमांमध्ये दिसले होते. मात्र, त्यावेळी त्यांचा चेहरा फुगलेला दिसत होता. ६९ वर्षांच्या पुतीन यांना रक्ताचा कॅन्सर झाल्याचाही दावा करत आहेत.