ETV Bharat / international

चीनचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, मतभेद दूर करण्यास तयार

गलवान खोर्यात घुसखोरी केल्यामुळे भारत आणि चीनच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करताना शेजारी राष्ट्रांना इशारा दिला होता. त्यांच्या या भाषणानंतर चीनचे परराष्ट्रमंत्री झाओ लिजान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

chin
चीनचे परराष्ट्रमंत्री झाओ लिजान
author img

By

Published : Aug 17, 2020, 6:16 PM IST

बिजींग - भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यातील घटनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर कुरबुरी केल्यास सैनिक चोख प्रत्युत्तर देतील, असा इशारा शेजारी राष्ट्रांना दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना चीनचे परराष्ट्रमंत्री झाओ लिजान यांनी भारतासोबतचे मतभेद दूर करण्यासाठी तयार असल्याचे सोमवारी म्हटले आहे.

चीनचे परराष्ट्रमंत्री तथा प्रवक्ता झाओ लिजान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याने विकास करण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर बोलताना देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांना भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिल्याचे स्पष्ट केले होते. यावर चीनच्या माध्यमातून परराष्ट्रमंत्री तथा प्रवक्ता झाओ लिजान यांना याबाबत छेडण्यात आले होते. त्यावर लिजान यांनी भारतासोबतचे मतभेद दूर करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.