ETV Bharat / international

Jamal Khashoggi murder case : खशोग्गी यांच्या हत्येचा मुद्दा सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्ससमोर मांडला - जो बायडेन - पत्रकार जमाल खशोग्गी हत्या प्रकरण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ( US President Joe Biden ) यांनी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान ( Saudi Crown Prince Mohammed bin Salman ) यांची भेट घेतली. या भेटीत बायडेन यांनी सौदी पत्रकार खशोग्गी यांच्या हत्येचा मुद्दाही उपस्थित केला.

Joe Biden
Joe Biden
author img

By

Published : Jul 16, 2022, 7:19 PM IST

जेद्दा: सौदी पत्रकार जमाल खशोग्गी यांच्या 2018 च्या हत्येप्रकरणी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान ( Saudi Crown Prince Mohammed bin Salman ) यांच्यासोबत शुक्रवारी झालेल्या बैठकीच्या सुरुवातीला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन ( US President Joe Biden ) यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्याच वेळी, सौदी अरेबियाकडून महत्त्वपूर्ण राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताना, आपण केलेल्या कथित मानवी हक्क उल्लंघनाकडे दुर्लक्ष करत असल्याची कल्पना त्यांनी नाकारली.

बायडेन म्हणाले, 'मी हे स्पष्ट केले की एक अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असल्याने, मी कोण आहे, कोणत्याही मानवी हक्कांच्या मुद्द्यावर मौन बाळगणे ही ओळख जुळत नाही.' ते म्हणाले, 'मी नेहमीच आपल्या मूल्यांसाठी उभा राहीन.' अमेरिकेत राहणाऱ्या खशोग्गी या लेखकाची चार वर्षांपूर्वी क्राउन प्रिन्स सलमानच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आली होती ( Journalist Jamal Khashoggi murder case ), असा अमेरिकन गुप्तचरांचा विश्वास आहे.

बायडेन म्हणाले की, प्रिन्स मोहम्मद यांनी दावा केला आहे की खशोग्गीच्या मृत्यूसाठी ते "वैयक्तिकरित्या जबाबदार" नाहीत. अध्यक्ष म्हणाले, 'मी सूचित केले की मला वाटते की ते (जबाबदार) आहेत'. या हत्येमुळे सौदी अरेबियाशी संबंध सुधारण्याच्या बायडेन यांच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. बायडेन यांचे शुक्रवारी सौदी अरेबियात आगमन ( Biden arrives in Saudi Arabia ) झाले. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी बायडेन यांचे राजवाड्यात स्वागत केले. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे.

हेही वाचा - Pakistan Court Declared : पीएम शाहबाज यांचा मुलगा पाक न्यायालयाकडून फरार घोषित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.