काबुल Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात शनिवारी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यानं 320 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं संयुक्त राष्ट्रानं म्हटलं आहे. मात्र, या आकडेवारीची अद्याप पुष्टी झालेली नाही. हेरात प्रांताला सर्वाधिक फटका बसला असून भूकंपामुळं शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
5.6 तीव्रतेच्या भुकंपाचे धक्के : देशाच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणानुसार, भुकंपात 100 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक अधिकाऱ्यानं सांगितलंय, तर 500 जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अफगाणिस्तानच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, शनिवारी दुपारी 12:11 वाजता रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रतेचा पहिला भूकंप आला. त्यानंतर 12.19 वाजता 5.6 तीव्रतेचा, दुसरा भूकंप आला. त्यानंतर 12.42 वाजता 6.3 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे.
भुकंपाचे पाच धक्के : यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हेरातच्या वायव्येस 40 किलोमीटर अंतरावर होता. रात्री 11 ते 1 च्या दरम्यान 4.6 ते 6.3 तीव्रतेचे एकूण पाच धक्के बसले. भूकंपामुळं सर्वाधिक प्रभावित झालेल्या हेरात प्रांताचे सार्वजनिक आरोग्य संचालक मोहम्मद तालेब शाहिद यांनी सांगितलं की, सध्या रुग्णालयात आणलेल्या लोकांच्या आधारे मृत तसंच जखमींची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर खरी आकेडवारी समोर येईल असं ते म्हणाले.
नेपाळमधील बझांगमध्ये 5.3 रिश्टर स्केलचा भूकंप : नेपाळच्या सुदूर पश्चिम भागात असलेल्या बझांगमध्ये शनिवारी सकाळी 11.45 वाजता 5.3 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र बझांग येथे होतं. 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या भूकंपानंतर येथे सलग 13 धक्के बसले आहेत. भूकंपानंतर लोक घराबाहेर पडले होते.
भूकंप का होतात? : पृथ्वीच्या आत 7 टेक्टॉनिक प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. ज्यावेळी या प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा भुकंप येतो. प्लेट्सवर जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. त्यामुळं जमीनीखालील उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते.
भूकंपाचे केंद्र, भूकंप तीव्रताचा अर्थ काय? : भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणजे ज्या ठिकाणी टेक्टॉनिक प्लेट आदळतात तो भुभाग होय. या ठिकाणी भूकंपाची कंपने अधिक तीव्रतेची असतात. कंपनाची वारंवारता जसजशी वाढते तसतसा त्याचा प्रभाव कमी होतो. तथापि, रिश्टर स्केलवर 7 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप झाल्यास, 40 किमीच्या त्रिज्येत हादरे जाणवतात. पण भूकंपाची वारंवारताची खाली किती आहे, यावरही अवलंबून आहे.
भूकंपाची तीव्रता कशी मोजली जाते ? रिश्टर स्केल वापरुन भूकंपाची तीव्रता मोजली जाते. त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात. भूकंप 1 ते 9 रिश्टर स्केलवर मोजले जातात. भूकंपाचं मोजमाप त्याच्या केंद्रस्थानावरुन केलं जातं. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेची तीव्रता त्यावरुन मोजली जाते. याच तीव्रतेला रिस्टर स्केल (भूकंपाची तीव्रता) असं म्हणतात.
हेही वाचा -