सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) - ट्विटरने त्यांचे अकाउंट सत्यापित करण्यासाठी सर्वांना आवाहन केले आहे. त्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत हे निश्चित झाले होते. मात्र ही रक्कम सर्वसाधारणपणे किती असेल याचा थोडक्यात अंदाज आला होता. ही रक्कम सर्वसाधारणपणे व्यक्तीला 800 ते 850 रुपये असे म्हटले होते. ही रक्कम आता ट्विटरच्यानुसार वार्षिक रुपये 7800 ठरवण्यात आली आहे. सध्या यावर डिस्काऊंट देऊन ही रक्कम वैयक्तिक ब्लू टिकसाठी 6800 प्रतिवर्ष करण्यात आली आहे. आता संस्थानाही सत्यापित करण्याचे आवाहन ट्विटरतर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी ट्विटर ओपन केल्यावर डाव्या बाजूला एक पर्याय देण्यात आला आहे. त्यामध्ये ट्विटर ब्लू या पर्यायाच्या खाली व्हेरिफाईड ऑरगनायझेशनचा पर्याय देण्यात आला आहे. त्याखाली संस्थानी त्यांना स्वतःला सत्यापित करण्याची माहिती देण्यात आली आहे.
सत्यापित संस्था सर्व प्रकारच्या संस्थांसाठी ही सुविधा देण्यात येत आहे. व्यवसाय, ना-नफा-ना-तोटा आणि सरकारी संस्था-त्यांची पडताळणी व्यवस्थापित करण्यासाठी, संलग्न आणि कोणतेही संबंधित खाते सत्यापित करण्यासाठी आणि नवीन वैशिष्ट्ये अनलॉक करण्यासाठी ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार सत्यापन व्यवस्थापन सोनेरी किंवा राखाडी चेकमार्क प्राप्त करण्यासाठी माहिती देण्यात आली आहे.
संस्थेच्या बरोबरच संस्थेशी सलग्न व्यक्तींनाही संस्थागत टिक मिळू शकते. तोतयागिरीपासून संरक्षण मिळवण्यासाठी योग्य ती टिक घेण्याचे आवाहन ट्विटरमार्फत करण्यात आले आहे. तोतयागिरी आढळल्यास सत्यापित संस्थांची तोतयागिरी करणारी खाती पुढील पुनरावलोकनासाठी ध्वजांकित केली जाणार आहेत. प्रीमियम खात्यांना विशेष सवलतही देण्यात येणार आहे. त्यासाठी संपर्क साधण्यासाठी संस्थांना विशेष प्रावधान केले आहे.
ट्विटर ब्लू धारक सर्व खाती संस्था आणि त्यांचे संलग्न Twitter Blue चे सर्व फायदे मिळवू शकणार आहेत. सत्यापित संस्थांसाठी तब्बल 82,300 रुपये प्रति महिना फी आकारण्यात येत आहे. तसेच त्यावरील करही वेगळे द्यावे लागणार आहेत. तसेच प्रत्येक अतिरिक्त संस्थेच्या संलग्न खात्यासाठी ₹4,120.00 प्रति हँडल प्रति महिना आहे अधिक कर लागू होतील.