इस्लामाबाद: पाकिस्तानात गेल्या 24 तासात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर आणि पावसाशी संबंधित इतर घटनांमध्ये किमान 36 जणांचा मृत्यू झाला असून 145 जण जखमी झाले आहेत ( 36 killed 145 injured Pakistan in 24 hrs ), अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ( NDMA) दिली. NDMA ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, देशभरात पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये किमान सात मुले आणि पाच महिलांचा समावेश आहे, अशी माहिती शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली आहे.
सिंध प्रांत हा सर्वाधिक 18 लोक ठार आणि 128 जखमी-
एनडीएमएने शनिवारी संध्याकाळी सांगितले की, देशातील दक्षिणेकडील सिंध प्रांत हा सर्वाधिक बाधित प्रदेश आहे, ज्यामध्ये 18 लोक ठार आणि 128 जखमी झाले ( 18 people died in Sindh province ) आहेत, त्यानंतर वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतात 11 मृत्यू आणि पूर्व पंजाब प्रांतात सात मृत्यू झाले आहेत. अहवालात म्हटले आहे की, देशात 27,870 घरे उद्ध्वस्त झाली, 10,860 घरे पूर्णपणे नष्ट झाली आणि 1,70010 अंशतः नष्ट झाली आहेत.
पावसामुळे पाकिस्तानात एकूण मृतांचा आकडा 728 वर -
जूनच्या मध्यापासून या मोसमातील पावसामुळे पाकिस्तानात एकूण मृतांचा आकडा 728 वर पोहोचला ( Pakistan due to rain Total death 728 ) आहे. ज्यात 156 महिला आणि 263 मुलांचा समावेश आहे आणि 1,291 इतर जखमी आहेत, असे NDMA ने म्हटले आहे. याशिवाय 116,771 घरे, 129 पूल आणि 50 दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत. पूरग्रस्त भागात NDMA, इतर सरकारी संस्था, स्वयंसेवक आणि गैर-सरकारी संस्थांद्वारे बचाव आणि मदत कार्य सुरू आहे.
राखीव बचाव पथके हाय अलर्टवर -
पाकिस्तानी लष्कराची मीडिया शाखा, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने शनिवारी संध्याकाळी एका निवेदनात म्हटले आहे की, लष्कराचे जवान सिंध आणि त्याची राजधानी कराचीमधील पूर मदत उपकरणांसह प्रभावित भागात पोहोचलेत. आयएसपीआरने सांगितले की, आर्मी बचाव पथके सिंधमधील बाधित भागात पाणी बाहेर काढण्याचे कार्य आणि रेशनचे वितरण करत आहेत, कराची आणि अंतर्गत भागात संततधार पाऊस आणि शहरी पूर पाहता कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राखीव बचाव पथके हाय अलर्टवर ( Reserve rescue teams on high alert ) आहेत.