ETV Bharat / international

People Killed In Open Fired : मेक्सिकोत माथेफिरुचा नागरिकांवर अंदाधूंद गोळीबार, तीन नागरिकांचा बळी; दोन अधिकाऱ्यांसह नागरिक जखमी

मेक्सिकोजवळील फार्मिंगटन परिसरात एका माथेफिरुने अंदाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात 3 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या गोळीबारात दोन पोलिसांसह सात नागरिक जखमी झाले आहेत.

People Killed In Open Fired
घटनास्थळ
author img

By

Published : May 16, 2023, 10:41 AM IST

न्यू मेक्सिको : नागरिकांवर माथेफिरुने केलेल्या अंदाधूंद गोळीबारात तीन नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याने खळबळ उडाली आहे. या माथेफिरुने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक नागरिक जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी न्यू मेक्सिकोजवळील फार्मिंगटन परिसरात घडली आहे. उटाह स्टेट लाईनजवळील फार्मिंग्टन परिसरात सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास हा गोळीबार झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. मेक्सिकोतील तेल आणि नैसर्गिक वायू उद्योगाला पुरवठा करणाऱ्या या परिसरात नागरिकांसह अधिकाऱ्यांचे वास्तव्य आहे.

या गोळीबारात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक नागरिक गंभीर जखमी झाले. त्यामुळे पोलिसांनी या माथेफिरू तरुणावर प्रत्त्युतरादाखल गोळीबार केला. या गोळीबारात या माथेफिरू तरुणाचा खात्मा करण्यात आला आहे. या घटनेत दोन पोलीस अधिकारी जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे - बॅरिक क्रुम, पोलीस उपप्रमुख

माथेफिरु तरुणाने केला अंदाधूंद गोळीबार : माथेफिरू तरुणाने रस्त्यावर अंदाधूंद गोळीबार सुरू केला. त्यानंतर घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलिसांनी या माथेफिरू तरुणाला थांबण्याचा इशारा दिला. मात्र त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक नागरिक गंभीर जखमी झाले. त्यामुळे पोलिसांनी या माथेफिरू तरुणावर प्रत्त्युतरादाखल गोळीबार केला. या गोळीबारात या माथेफिरू तरुणाचा खात्मा करण्यात आल्याची माहिती फार्मिंग्टन पोलीस उपप्रमुख बॅरिक क्रुम यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांना तीन जण मृतावस्थेत आढळल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संशयित माथेफिरू तरुणाची ओळख पटवण्यात आली नसल्याचेही क्रूम यांनी स्पष्ट केले.

पोलीस अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर : माथेफिरुने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. या गोळीबारात सात नागरिक जखमी असल्याची माहिती सॅन जुआन प्रादेशिक वैद्यकीय केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे. यात फार्मिंग्टन पोलीस अधिकारी आणि राज्य पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णालयाचे प्रवक्ते रॉबर्टा रॉजर्स यांनी मात्र या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. दोन अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस उपप्रमुख क्रूम यांनी दिली. तर दोन पोलीस अधिकाऱ्यांना गोळी लागली आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापौर नाट डकेट यांनी दिली आहे.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन : माथेफिरू तरुणाने केलेल्या हल्ल्यात तीन निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यामुळे आम्हाला दुख झाल्याची महापौर नाट डकेट यांनी स्पष्ट केले आहे. या हल्ल्याशिवाय इतर कोणतीही धमकी हल्लेखोरांकडून देण्यात आली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. शहर, सॅन जुआन काउंटी आणि राज्य पोलीस अधिकाऱ्यांनी या माथेफिरुच्या गोळीबाराचा धैर्याने सामना करत त्याचा खात्मा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोळीबाराने कारची झाली चाळणी : माथेफिरू तरुणाने गोळीबार केल्यामुळे रस्त्यावर असलेल्या जोसेफ रोबलेडो या तरुणाने आपली पत्नी आणि एका वर्षाच्या मुलीसह लॉन्ड्री रूममध्ये आश्रय घेतला. मात्र यावेळी माथेफिरुने केलेल्या गोळीबारातील एक गोळी खिडकीतून येऊन मुलीच्या अगदी जवळून गेल्याचे जोसेफने सांगितले. त्यामुळे आम्ही मागच्या दारातून कुंपणावरुन उडी घेत जीव मुठीत घेऊन पळाल्याचेही त्याने सांगितले. यावेळी एक वृद्ध महिला गाडी चालवत असताना जखमी झाल्याचेही त्याने स्पष्ट केले. माझ्या कारला गोळ्यांनी चाळणी केल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

हेही वाचा -

  1. Imran Khan Bail : इम्रान खान यांना मोठा दिलासा, सर्व प्रकरणांमध्ये जामीन मंजूर
  2. Race for Karnataka CM 2023 : कर्नाटकात मुख्यमंत्री पदाचा पेच कायम; डीके शिवकुमार म्हणाले, माझी ताकद 135 आमदार!
  3. Mamata Banerjee On Congress : काँग्रेसला कर्नाटकात मदत करू, त्यांनी बंगालमध्ये आमच्याबरोबर लढू नये - ममता बॅनर्जी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.