काबुल : अफगाणिस्तमध्ये तालिबानने मोठा हल्ला केला असून यात 16 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. खान अबाद जिल्ह्यातील एका सुरक्षा चौकीवर तालीबानने हा हल्ला केला. कुंडूज प्रांतात ही घटना घडली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली नसल्याची माहिती कुंडूज प्रांताच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाबाबतही बोलले जात आहे. ट्रम्प यांनी अफगाणिस्तानात तैनात असलेले अमेरिकी सैन्य 2021च्या मे पर्यंत मागे घेण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेचा बायडेन आढावा घेणार आहेत. कारण तालिबान या संघर्षात मागे हटण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. माध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानात शांतता राखण्यासाठी अमेरिकेने तालिबान्यांना कट्टरतावाद्यांशी संपर्क न ठेवण्याची अट घातली आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षण : ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार