ETV Bharat / international

Russia-Ukraine War : युक्रेनवर हल्ला करण्याासाठी रशियाकडून 16,000 माजी ISIS सैनिकांची भरती, युक्रेनचा दावा

author img

By

Published : Mar 11, 2022, 5:23 PM IST

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध ( Russia-Ukraine War ) पुकारलं आहे. आज युद्धाचा 16 वा ( Russia-Ukraine War 16th day ) दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर युक्रेनमधून दोन लाखांहून अधिक लोकांना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडले आहे.

रशिया-युक्रेन युद्ध
Russia-Ukraine War

कीव - रशियन अधिकार्‍यांनी युक्रेनियन नागरिकांविरुद्ध वापरण्यासाठी 16,000 माजी ISIS सैनिकांची घाईघाईने भरती करण्याची घोषणा केल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाचे प्रमुख मिखाईल पोडोलियाक यांनी केला आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याशी युक्रेन आणि पाश्चात्य निर्बंधांवर चर्चा करण्यासाठी चर्चा केली.

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध ( Russia-Ukraine War ) पुकारलं आहे. आज युद्धाचा 16 वा ( Russia-Ukraine War 16th day ) दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर युक्रेनमधून दोन लाखांहून अधिक लोकांना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडले आहे. सामान्य लोक अजूनही युक्रेनमध्ये जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. वीज, अन्न, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा युक्रेनमध्ये झाला आहे. तुर्कस्तानमध्ये रशिया आणि युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर काही चांगली बातमी येईल, अशी लोकांना आशा होती. परंतु तसे झाले नाही आणि चर्चा व्यर्थ ठरली.

मारियुपोलच्या महत्त्वपूर्ण दक्षिणेकडील बंदरात बुधवारी झालेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये एका मुलाचा समावेश आहे. या घटनेत 17 जण जखमी झाले आहेत. बुधवारी मारियुपोलच्या बंदर शहरातील प्रसूती रुग्णालयावर रशियन हवाई हल्ल्यात एका मुलासह तीन लोक ठार झाले. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी गुरुवारी पोलंडच्या भेटीदरम्यान रशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली.

हेही वाचा - Russia Ukraine War : युक्रेनमधून पाकिस्तानी तरुणीची सुटका, मोदी आणि भारतीय दूतावासाचे मानले आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.