बगदाद - इराकमधील अमेरिकीच्या दुतावास परिसरात पुन्हा एकदा रॉकेट हल्ला झाला आहे. रविवारी सकाळी हल्ला झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेच्या लष्कराने दुजोरा दिला आहे. इराणचे लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांना रॉकेट हल्ल्यात ठार मारल्यानंतर इराकमधील अमेरिकेचे लष्कर आणि दुतावासावर याआधीही १९ वेळा हल्ले झाले आहेत.
रॉकेट नक्की किती ठिकाणांवर डागण्यात आले. हल्ल्यात जीवितहानी झाली की नाही, याचीही माहिती मिळू शकली नाही. अमेरिकी दूतावास ज्या भागात आहे त्या भागामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या परिसराला 'ग्रीन झोन' असेही म्हटले जाते. आत्तापर्यंत १९ वेळा इराकमधील लष्कर आणि दुतावासावर हल्ला करण्याचा प्रयत्न बंडखोरांकडून झाला आहे.
हल्ल्यांची जबाबदारी आत्तापर्यंत कोणत्याही संघटनेने घेतली नाही, मात्र, इराणच्या पाठिंब्याने हल्ला होत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात इराकमध्ये अमेरिकेचा एक ठेकेदार ठार झाला होता. त्यानंतर अमेरिकेने कारवाई करत इराकचे लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांना ठार केले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.