तेहरान - पेट्रोलच्या दरात तिप्पट वाढ करण्यात येईल. तसेच, त्याचे वाटप रेशन प्रक्रियेतून होईल अशी घोषणा इराण सरकारने दोन दिवसांपूर्वीच केली. या निर्णयाविरोधात इराणी नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा उद्रेक देशातील अनेक शहरात झालेला दिसत आहे.
येथून पुढे पेट्रोलचे वाटप रेशनच्या माध्यमातून करण्यात येईल अशी घोषणा शुक्रवारी उप राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बघेर नोबख्त यांनी केली. या घोषणेच्या आधी नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही.
खासगी वाहनांना येथून पुढे महिन्याला ६० लिटर पेट्रोल वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, दरात ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. जी किंमत १५ हजार इराणीयन रायल्स इतकी आहे. ६० लिटरपेक्षा जास्त पेट्रोल वापरायचे झाल्यास प्रती लिटर ३० हजार रायल्स इतकी किंमत मोजावी लागेल.
हेही वाचा - रोहिंग्यांच्या नरसंहाराची सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात; म्यानमार सरकारचा विरोध
या निर्णयाचा नागरिकांकडून निषेध करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या खिशावर अतिरिक्त ताण येईल असे नागरिकांचे म्हणणे आहे.