सना - येमेन सरकारच्या निष्ठावान सैन्य दलांनी देशाच्या दक्षिणेकडील प्रांत धलियामध्ये हौथी गटाच्या 12 सशस्त्र बंडखोरांना ठार केल्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा - इराणमध्ये 2017 मध्ये अशांतता पसरवण्याच्या आरोपाखाली पत्रकाराला दिली फाशी
सिन्हुआ या वृत्तसंस्थेने सरकार समर्थक सैन्याने दिलेल्या माहितीवरून शनिवारी अहवाल प्रसिद्ध केला आहे. सैन्याच्या तुकड्यांनी हौथींच्या नियंत्रणाखाली असलेल्या धलियाच्या ईशान्य भागात बंडखोरांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे, असे यात म्हटले आहे.
निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, सरकार समर्थक लष्करी तुकड्यांचा सशस्त्र बंडखोरांसह तीव्र संघर्ष झाला. त्यात 12 बंडखोर ठार झाले आहेत. काही तास चाललेल्या या संघर्षात काही बंडखोरही जखमी झाले आहेत. तथापि, कोणत्याही सरकार समर्थक दलाकडून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
निवेदनात म्हटले आहे की, सरकार समर्थक सैन्याने हौथींची वाहने आणि शस्त्रे जप्त केली आहेत.
हेही वाचा - इराणचा इस्रायलवर अणुवैज्ञानिकाची हत्या केल्याचा आरोप