सेऊल - उत्तर कोरियाने उपग्रह प्रक्षेपणासाठीच्या खुल्या जागेत अत्यंत महत्त्वाची चाचणी घेतल्याचे सांगितले आहे. योनहॅप या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.
उत्तर कोरियाने मे महिन्यापासून किमान १२ वेळा त्यांच्या उत्तर किनाऱ्यावरून अनेकदा प्रक्षेपण चाचण्या घेतल्या आहेत. सोमवारी उत्तर कोरियाने अमेरिकेसोबतच्या सर्व चर्चा थांबवत असल्याचे म्हटले होते. यानंतर या देशाकडून ही चाचणी घेण्यात आली आहे.
अमेरिका आणि उत्तर कोरियादरम्यानची अणू करारावरील चर्चा थांबवण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यातील हनोई परिषदेनंतर या करारावरून फेब्रुवारीमध्ये बेबनाव झाला होता. यानंतर प्योंग्यांग येथून अमेरिकेला या वर्षाच्या अखेरीपर्यंत आपला दृष्टीकोन बदलण्याविषयी बजावण्यात आले होते.