तेल अवीव- इस्त्रायली वायू दलाच्या विमानांनी गाझा पट्ट्यात जोरदार हल्ले केले आहेत. यामध्ये हमास इस्लामिक चळवळीच्या चौकीसह, रॉकेट निर्मितीस्थळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पॅलेस्टाईनकडून करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल शनिवारी हा हल्ला करण्यात आल्याची माहिती इस्त्रायलच्या सैन्य दलांकडून देण्यात आली आहे.
हमासची चौकी उद्ध्वस्त-
इजरायली लष्कराने सांगितले की पॅलेस्टाईनच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या दक्षिण भागात दोन रॉकेट हमले केले होते. त्यानंतर शनिवारी गाझा पट्ट्यात प्रत्युत्तरादाखल वायूदलाच्या जवानांनी दहशतवादी समूह हमास यांच्या रॉकेट निर्मितीची स्थळे आणि प्रशिक्षण स्थळांवर हल्ले करण्यात आला. पॅलेस्टाईनच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात कोणत्याही जीवित हानीची माहिती नाही.
अश्केलोन शहरावर डागले होते दोन रॉकेट-
इस्त्रायल सैन दलाच्या माहितीनुसार शुक्रवारी इस्त्रायलच्या सीमावर्तीय भागातील अश्केलोन शहराला दोन रॉकेटचा निशाणा करण्यात आले होते. मात्र, तो हल्ला हवेतच उद्ध्वस्त केला. त्यानंतर त्या रॉकेट हल्ल्याची पॅलिस्टाईने जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, या हल्ल्यामुळे सीमेवर महिनाभरापासून असलेली शांतता भंग पावली आहे.
पॅलेस्टाईनचा रॉकेट हल्ला आणि इस्त्रायलकडून प्रत्युत्तरदाखल नेहमीच हल्ले केले जात आहेत. मात्र, गेल्या महिनाभरापासून कोरोनाच्या महामारीमुळे यामध्ये थोडीशी शांतता दिसून येत होती. मात्र, शुक्रवार आणि शनिवारच्या हल्ल्यानंतर यामध्ये खंड पडला आहे.