जेरुसलेम : इस्राईलने रविवारपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देशात आता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक नसणार आहे. तसेच, केजीपासून १२वी पर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णयही इस्राईल सरकारने घेतला आहे.
शाळांमध्ये मास्क अनिवार्य..
देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे बंधन हटवण्यात आले आहे. मात्र, शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. देशाचे आरोग्यमंत्री यूली एडेलस्टेन यांनी याबाबत माहिती दिली. शाळांसोबतच सुपरमार्केट किंवा मॉल अशा बंदिस्त ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
डिसेंबरमध्येच इस्राईलने देशात लसीकरण मोहीम सुरू केली होती. त्यानंतर आतापर्यंत देशातील ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांना फायझर कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.
हेही वाचा : इजिप्तमध्ये पुन्हा रेल्वे अपघात; ११ ठार, तर ९८ प्रवासी जखमी..