बगदाद - इस्लामिक स्टेट (आयएस) च्या दहशतवाद्यांनी इराकच्या किरकुक प्रांतात दोन तेल विहिरींना आग लावल्याची माहिती समोर आली आहे. तेलमंत्री इहसान अब्दुल-जब्बार इस्माईल यांनी सांगितले की, ही आग यशस्वीरीत्या विझविण्यात आली आहे.
पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी यांना लिहिलेल्या पत्रात सिन्हुआने इस्माईल यांच्या विधानाचा हवाला देताना सांगितले की, इराकच्या तेल कंपन्यांनी किरकुक प्रांतातील खुब्बाज तेल क्षेत्रातील दोन विहिरींमध्ये लागलेली आग त्वरित विझविली.
हेही वाचा - पाकिस्तानमध्ये 30 वर्षात 138 पत्रकारांची हत्या
आपल्या पत्राद्वारे इस्माईल यांनी तेल विहिरींची आग विझविण्यास मदत करणारे इराकी नॉर्थ ऑईल कंपनी आणि राष्ट्रीय तेल कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. 'राष्ट्रीय तेलाच्या संपत्तीला लक्ष्य करणार्या दहशतवादाला हा योग्य प्रतिसाद आहे,' असे त्यांनी म्हटले आहे.
नॉर्थ ऑइल कंपनीच्या सूत्रांनी 9 डिसेंबरला सिन्हुआला सांगितले की, इराकची राजधानी बगदादच्या उत्तरेस 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुब्बाज ऑईल फील्डमध्ये आयएसच्या दहशतवाद्यांनी दोन बॉम्ब लावले. यामुळे दोन्ही विहिरींमध्ये भीषण आग लागली.
सरकारने 2017 च्या उत्तरार्धात देशभरात दहशतवादी गटांचा पराभव झाल्याचे जाहीर केल्यानंतर इराकच्या तेल प्रतिष्ठान व पाइपलाइनवर अनेकदा कट्टरपंथी आयएस दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.
हेही वाचा - येमेनमध्ये सरकारसमर्थक सैन्याने 12 हौथी बंडखोरांना केले ठार