ETV Bharat / international

संतप्त आंदोलकांनी इराकमध्ये पेटविले संसदेचे कार्यालय

author img

By

Published : Aug 22, 2020, 1:23 PM IST

संतप्त आंदोलकांनी बासरा प्रांतामधील संसदेच्या इमारतीला आग लावली होती. ही इमारत बगदादमधील मुख्य कार्यालयाचे स्थानिक कार्यालय आहे. इराकच्या एकूण खनिज तेलाच्या उत्पन्नात या प्रांताचा आजवर सिंहाचा वाटा राहिला आहे.

इराकमध्ये हिंसक आंदोलन
इराकमध्ये हिंसक आंदोलन

बासरा – इराकमधील खनिज तेलाने समृद्ध असलेल्या बासरा भागात अनागोंदी निर्माण झाली आहे. बासरामध्ये दोन सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या झाल्याने आंदोलकांनी तेथील संसदेचे स्थानिक कार्यालय पेटविले आहे.

संतप्त आंदोलकांनी बासरा प्रांतामधील संसदेच्या इमारतीला आग लावली होती. ही इमारत बगदादमधील मुख्य कार्यालयाचे स्थानिक कार्यालय आहे. इराकच्या एकूण खनिज तेलाच्या उत्पन्नात या प्रांताचा आजवर सिंहाचा वाटा राहिला आहे.

आंदोलकांनी बाटलीत तेलइंधन भरून सुरक्षा दलावर भिरकावल्याचे एका छायाचित्रकाराने प्रत्यक्ष पाहिले. यामध्ये सहा सुरक्षा दलाचे कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मानवाधिकार आयुक्त कार्यालयाचे प्रवक्ते अली अल-बयाती यांनी दिली. बासराचे राज्यपाल असाद-अल-इदानी यांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांनी मागणी केली आहे. अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात बुधवारी सामाजिक कार्यकर्ते रेहम याकुब यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरे सामाजिक कार्यकर्ते तहसीन ओसामा यांचीही हत्या झाली आहे. त्यामुळे आंदोलकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे.

बासरामधील परिस्थिती पाहून पंतप्रधान मुस्तफा अल-काधिमी यांनी बासराचे पोलीस अधीक्षक यांना सेवेतून काढून टाकले आहे. मात्र, त्यावर आंदोलक समाधानी नाहीत. दोन कार्यकर्त्यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्या आरोपींवर कारवाई करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.