बगदाद - इराकचे पंतप्रधान अदेल अब्दुल महदी यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. देशभरात सुरू असलेल्या सरकार विरोधी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संसदेमध्ये आपला राजीनामा दाखल केला.
-
Iraqi PM Adel Abdul Mahdi resigns amid anti-government protests
— ANI Digital (@ani_digital) November 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI story | https://t.co/sQex0JvWvd pic.twitter.com/X8kIk1cj3M
">Iraqi PM Adel Abdul Mahdi resigns amid anti-government protests
— ANI Digital (@ani_digital) November 30, 2019
Read @ANI story | https://t.co/sQex0JvWvd pic.twitter.com/X8kIk1cj3MIraqi PM Adel Abdul Mahdi resigns amid anti-government protests
— ANI Digital (@ani_digital) November 30, 2019
Read @ANI story | https://t.co/sQex0JvWvd pic.twitter.com/X8kIk1cj3M
गेल्या काही महिन्यांपासून इराकची राजधानी बगदाद आणि देशाच्या दक्षिण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारविरोधी आंदोलने सुरू होती. १ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनांमध्ये आतापर्यंत ४००हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे, तर १५ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, आपण राजीनामा देणार असल्याचे इराणच्या पंतप्रधानांनी शुक्रवारीच जाहीर केले होते.
मी संसदेमध्ये आपला राजीनामा सादर करणार आहे, त्यानंतर संसद पंतप्रधानपदासाठी नवा उमेदवार निवडू शकेल, असे महदी यांनी शुक्रवारी जाहीर केले होते. त्यानंतर काल (शनिवार) झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर महदी यांनी आपला औपचारिक राजीनामा दाखल केला.
हेही वाचा : लंडन ब्रिज हल्ला; इसिसने स्वीकारली जबाबदारी