काबुल (अफगाणिस्तान) - शांतता करारासाठी कित्येक स्तरावर प्रयत्न करुनही अफगाणिस्तानमधील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. तेथे सुरक्षा दले आणि तालिबान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यापार्श्वभूमीवर तालिबान जर दहशतवादाच्या बळावर अफगाणिस्तानच्या सत्तेत आले तर युरोपियन युनियन आणि इतर देश त्यांच्या राजवटीला मान्यता देणार नाहीत, असा पुनरुच्चार युरोपियन युनियनच्या राजदूतांनी काढला आहे.
युरोपियन युनियन त्यांना ओळखणार नाही -
अफगाणिस्तानातील युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाचे (राजदूतावास) प्रमुख थॉमस निकोलसन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की. "जर तालिबान लष्करी बळावर सत्तेत आले तर युरोपियन युनियन त्यांना मान्यता देणार नाही."
आम्ही राजकीयदृष्ट्याही सहभागी होऊ -
"आम्ही येथील परिस्थितीबद्दल स्पष्टपणे खूप चिंतीत आहोत. आम्ही शक्य तितके अफगाणिस्तानात सहभागी राहण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमची विकास मदत सुरू आहे. आम्ही राजकीयदृष्ट्याही सहभागी होऊ." असे म्हणत निकोलसन यांनी देशातील सुरक्षेच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
तालिबानने हल्ले वाढवले -
अलीकडील आठवड्यात अफगाणिस्तानात पुन्हा हिंसाचार वाढत आहेत. कारण अमेरिकन आणि नाटो सैन्याने देशातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, तालिबान आता पुन्हा हल्ले करत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - अफगाणिस्तानमध्ये मृत्यूचे तांडव; दोन दिवसात १००हून अधिक जवान ठार