ETV Bharat / international

लसींच्या जागतिक वितरणात एक धक्कादायक 'असंतुलन'; डब्ल्यूएचओ प्रमुखांनी व्यक्त केली चिंता - जागतीक कोरोना लसीकरण न्यूज

कोरोना लसीकरणाच्या असंतुलनावर डब्ल्यूएचओ प्रमुखांनी चिंता व्यक्त केली. गेल्या सहा आठवड्यामध्ये 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना लसीचे 38 मिलियन डोस पुरवण्यात आले आहेत. यातील बर्‍याच देशांमध्ये सर्व आरोग्य कर्मचारी किंवा फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कव्हर करण्यासाठी लसीचा पुरेसा साठा नाही. लसींच्या जागतिक वितरणात एक धक्कादायक असंतुलन अजूनही आहे, असेही त्यांनी सांगितले.

डब्ल्यूएचओ प्रमुख
डब्ल्यूएचओ प्रमुख
author img

By

Published : Apr 11, 2021, 5:59 PM IST

जिनेव्हा - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा प्रसार होऊन एक वर्ष उलटले आहे. मात्र, कोरोना अटोक्यात आलेला नाही. कोरोनावर अनेक लसी तयार करण्यात आल्या आहेत. अनेक देशात लसीकरणही सुरू झाले आहे. मात्र, लसीकरणानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. यातच कोरोना नियामांचे पालन करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रायसस यांनी दिला आहे. तसेच त्यांनी कोरोना लसीकरणाच्या असंतुलनावर चिंता व्यक्त केली. गरीब देशांमध्ये कोरोना लसीकरणामध्ये धक्कादायक असंतुलन आहे. 220 देशांपैकी 194 देशात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तर अद्याप 26 देशांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. या 26 देशांपैकी 7 देशांना लसीचा पुरवठा करण्यात आला असून तिथे लवकरच लसीकरणाला सुरवात करण्यात येणार आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये आणखी पाच देशांना कोरोना लसीचा पुरवठा करण्यात येईल, असे टेड्रोस अधनोम घेब्रायसस यांनी सांगितले.

डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रायसस कोरोना लसीकरणावर माहिती देताना....

विविध कारणांमुळे 14 देशांमध्ये कोरोना लसीकरणाला सुरवात करण्यात आलेली नाही. काही देशांनी कोव्हॅक्सच्या माध्यमातून लसीकरण करण्याची विनंती केली नाही. काही देश लसीकरणासाठी अद्याप तयार नाहीत. तर काही देश येत्या आठवड्यात किंवा महिन्यात लसीकरण सुरू करण्याची योजना आखत आहेत, असे टेड्रोस अधनोम घेब्रायसस यांनी सांगितले.

लसीकरणात धक्कादायक असंतुलन

गेल्या सहा आठवड्यामध्ये 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना लसीचे 38 मिलियन डोस पुरवण्यात आले आहेत. यातील बर्‍याच देशांमध्ये सर्व आरोग्य कर्मचारी किंवा फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कव्हर करण्यासाठी लसीचा पुरेसा साठा नाही. लसींच्या जागतिक वितरणात एक धक्कादायक असंतुलन अजूनही आहे, असेही त्यांनी सांगितले.

गरिब देशांमध्ये लसीकरणाचा सरासरी वेग कमी -

श्रीमंत देशांमध्ये सरासरी चारपैकी एकाला लस मिळाली आहे, तर गरीब देशांमध्ये ही संख्या 500 ते 1 अशी आहे. मार्चअखेर सुमारे 100 दशलक्ष डोसचे वितरण करण्याचे लक्ष्य होते. परंतु, पुरवठ्यातील लक्षणीय कमतरतेमुळे केवळ 38 मिलियन डोस वितरित करू शकलो आहोत. एप्रिल आणि मेमध्ये याला गती मिळेल, अशा आशा टेड्रोस अधनोम घेब्रायसस यांनी व्यक्त केली. श्रीमंत देशांनी विकसनशील देशांना कोरोना लसीचा पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा - निकालाआधीच तामिळनाडूत काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू; जिंकल्यास पोटनिवडणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.