ETV Bharat / international

नव्या कोरोना विषाणूमुळे ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊन

author img

By

Published : Jan 5, 2021, 7:57 AM IST

Updated : Jan 5, 2021, 8:11 AM IST

नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. नवा विषाणू जास्त संसर्गजन्य असल्याने ब्रिटनमध्ये मागील काही दिवसांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

बोरिस जॉन्सन
बोरिस जॉन्सन

लंडन - नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. नवा विषाणू जास्त संसर्गजन्य असल्याने ब्रिटनमध्ये मागील काही दिवसांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे.

रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने लॉकडाऊन -

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर ब्रिटनने महामारीविरोधात चांगला लढा दिला. आपण सर्वजण एकत्र येऊन कोरोनाचा सामना करत आहोत. पुढेही असेच प्रयत्न सुरू ठेऊ. मात्र, आता नवा विषाणू आढळून आला आहे. यामुळे रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून हे देशासाठी चिंताजनक आहे, असे पंतप्रधान बोरिस जॉन्सन देशाला संबोधित करताना म्हणाले. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णालयांवरील ताण वाढला आहे. मागील आठवड्यात देशभरात २७ हजार जणांना कोरोनाची लागण झाली. एप्रिल महिन्यात कोरोनाचे रुग्ण आढळले होते, त्यापेक्षाही जास्त रुग्ण आता आढळत आहेत, असे जॉन्सन म्हणाले.

अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरीक घराबाहेर पडणार -

अत्यावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी किंवा वैद्यकीय मदत मिळवण्यासाठीच नागरिकांना घरातून बाहेर निघण्याची परवानगी आहे. तसेच घरगुती हिंसाचारापासून सुटका मिळवण्यासाठी घरातून बाहेर पडू शकतात. देशभरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये व्हर्च्युअली सुरू राहतील. अत्यावश्यक क्षेत्रातील कामगारांना बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. धार्मिक स्थळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत सुरू राहणार आहेत. मात्र, मैदानी खेळांना बंदी घालण्यात आली आहे.

स्कॉटलँडसह वेल्समध्येही लॉकडाऊन -

ब्रिटनने सोमवारी स्कॉटलँडमध्ये लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर वेल्स आणि नॉर्थन आयर्लंड भागातही लॉकडाऊन जाहीर केला. आता इंग्लडमध्येही कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मागील एक आठवड्यात देशात सुमारे २० टक्के रुग्णांचा मृत्यू झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Jan 5, 2021, 8:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.