लंडन - सॅमसंगने आता अत्यंत किफायतशीर गॅलेक्सी ए42 5जी फोन लाँच केला आहे. याची किंमत 33 हजार रुपये आहे. या फोनसह सॅमसंगने आपल्या ए सीरीज लाइनअप अधिक मजबूत केले आहे आणि यासह आपल्या पोर्टफोलिओमध्ये 5 जी कनेक्टिव्हिटीही जोडली आहे.
हा फोन ब्रिटनमध्ये 6 नोव्हेंबरपासून खरेदी करता येणार आहे. यामध्ये 128 जीबी इंटर्नल स्टोरेज आणि 4 जीबी रॅम आहे. तर, याची मेमरी 1 टीबीपर्यंत एक्स्पाण्ड करता येणार आहे.
हेही वाचा - भारतात ओएलएक्सने दिला २५० कर्मचाऱ्यांना नारळ, कारण...
या फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे आणि बऱ्याच वेळेपर्यंत चालू शकणारी फास्ट चार्जिंग बॅटरीही आहे. सोबतच यामध्ये इनफिनिटी यू डिस्प्ले आहे.
हा डिव्हाइस प्रिझम डॉट ब्लॅक, प्रिझम डॉट व्हाइट आणि प्रिझम डॉट ग्रेट या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.
याचा मुख्य कॅमेरा 48 एमपीचा आहे आणि सेल्फी कॅमेरा 20 एमपीचा आहे.
हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून, घ्या आजचे दर