ETV Bharat / international

कोरोनावर जगात पहिल्या लसीचा शोध..! रशियात लस नोंदणीवरून प्रमुख डॉक्टरांचा राजीनामा - Alexander Chuchalin

कोणत्याही लसीला मान्यता मिळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या नैतिक परिषदेची अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक असते. मात्र, देशातून स्पूटनिक-5 वर टीका होत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना लस
कोरोना लस
author img

By

Published : Aug 14, 2020, 7:33 PM IST

मॉस्को – रशियाने कोरोनावरील विकसित केलेल्या स्पूटनिक-5 बाबत धक्कादायक बाब घडली आहे. ही चाचणी महत्त्वाच्या तिसऱ्या टप्प्यावर असताना रशियन सरकारने लसीची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या श्वसनविकारावरील एका वरिष्ठ डॉक्टरने रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या नैतिक परिषदेवरून तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून स्पूटनिक-5 ची नोंदणी थांबवावी अशी प्राध्यापक अलेक्झांडर चुचॅलिन यांची इच्छा होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी जगातील पहिल्या कोरोनावरील लसीची नोंदणी करण्यात येणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले. त्यानंतर रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्खो यांनी कोरोनावरील लसीचे दोन आठवड्यात उत्पादन करणार असल्याचे बुधवारी जाहीर केले. असे असले तरी जगभरात रशियाने विकसित केलेल्या कोरोना लसीबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

‘स्पूटनिक-5’ ही किती परिणामकारक आहे, याची उपलब्ध झाली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी स्पष्ट केले होते. कोणत्याही लसीला मान्यता मिळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या नैतिक परिषदेची अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक असते. मात्र, देशातूनच स्पूटनिक व्हीवर टीका होत असल्याचे दिसून येत आहे.

लस ही मानवासाठी किती सुरक्षित आहे, हे नैतिकतेचे अवलोकन करणारे म्हणून प्रथम पाहावे, असे चुचॅलिन यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.