कीव - रशियाने युक्रेन विरोधात पुकारलेल्या युद्धाचे ( Ukraine Russia Conflict ) जगभरात पडसाद उमटले आहेत. युद्धाचा आज तेरावा दिवस आहे, मात्र युद्ध शमण्याचे नाव घेत नाही. ताज्या माहितीनुसार युक्रेनने खार्किव मध्ये रशियन मेजर जनरल विटाली गेरासिमोव यांना ठार केले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील दोन्ही बैठकींमध्ये काहीही निष्पण्ण झालेले नाही. सोमवारी बैठकीची तिसरी फेरी झाली मात्र त्याचे परिणामही समाधानकारक मिळालेले नाहीत.
संपूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या या हल्ल्याचा आता जगभरातून निषेध करण्यात येत असून, युद्ध थांबावावे अशी मागणी होत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीयन संघातील देशांनी एकत्र येत रशियावर कडक आर्थिक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्बधांमुळे रशियाची कोंडी होईल, असा दावा करण्यात येत आहे.
अणुऊर्जा प्रकल्पावर रशियन सैन्याचा ताबा -
रशियाने युक्रेनच्या झॅपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर ताबा मिळवला आहे. यानंतर ब्रिटनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. एनरहोदर हे नीपर नदीवर वसलेलं एक शहर आहे. एनरहोदरमध्ये युरोपातील सर्वात मोठं झॅपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्प आहे. युक्रेनच्या एकूण वीज उत्पादनाच्या जवळपास 25 टक्के उत्पादन या प्रकल्पामध्ये होतं. जर रिॲक्टरला धक्का लागला असता तर चर्नोबिलपेक्षाही 10 पटीने विध्वंस झाला असता.
भारताचे रशिया-युक्रेनला शस्त्रसंधीचे आवाहन -
भारताने रशिया-युक्रेनला शस्त्रसंधीचे आवाहन केले आहे. शस्त्रसंधी लागू केल्याशिवाय 3000 नागरिकांना मायदेशी आणण्याच्या प्रयत्नात मोठे अडथळे असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. पूर्व युक्रेनमधील युद्धग्रस्त भागात अडकलेल्या भागातून भारतीयांना सुखरूप आणणे ही आमची प्राथमिकता असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. युद्धविराम झाल्यास भारतीयांना तातडीने मायदेशी आणता येईल, असेही त्यांनी म्हटलं.
भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम -
युक्रेनच्या सुमीमध्ये (In the Sumi of Ukraine) अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा धक्का (Big shock to Indian students) बसला आहे, रशियाने मानवतावादी कॉरिडॉर उघडला होता त्यामुळे सुमी येथील भारतीय विद्यार्थ्यांच्या स्थलांतराची आशा होती पण युध्दविराम अयशस्वी ठरल्यामुळे (Ceasefire failed) विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतिगृहात परत (Students Sent Back) जाण्यास भाग पाडले गेले.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. आणखी एक विद्यार्थी कीवमध्ये गोळीबारात जखमी झाला, अशी माहिती केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी दिली. हा विद्यार्थी कीवमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला गोळी लागली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे ते म्हणाले. या विद्यार्थ्याचे नाव हरज्योतसिंग आहे.
रशियातील नागरिक पुतीनविरोधात रस्त्यावर -
युक्रेनविरोधात रशियाने पुकारलेल्या युद्धाला खुद्द रशियामधील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. रशियातील नागरिक पुतीनविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी युक्रेन विरोधातील युद्ध बंद करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी रस्त्यावर येत निर्देशने केल्याने रशियातील हजारो नागरिकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रशियामध्ये सोशल मीडियावर देखील बंदी घालण्यात आली आहे. रशियामध्ये फेसबूक बंद करण्यात आले आहे.
युक्रेनचे महत्त्व -
युक्रेन हा भारतासारखाच बहुभाषिक देश असून रशिया आणि युक्रेनियन लोकांचा वंश एकच म्हणजे स्लॉव्ह आहे. मात्र, या देशाचे दोन ठळक भाग आहेत. पश्चिमेकडील भागावर युरोपचा मोठा प्रभाव आहे. तर पूर्वेकडील भागावर रशियाचा प्रभाव आहे. युक्रेन हा युरोप आणि रशिया यांच्या दरम्यान असल्याने दोन्ही तो आपल्या प्रभावाखाली असावा, असे युरोपीय देश आणि रशिया या दोघांनाही वाटते. आर्थिक कारणांबरोबरच सामरिक कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. आता पुतीन यांनी युद्ध पुकारल्याने हे युरोपातील 1945 नंतरचं सगळ्यात मोठं युद्ध असेल. केवळ युक्रेनची नव्हे तर रशियाचीही या युद्धात मोठी जीवितहानी होत आहे.