मॉस्को - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवर प्रभावी लस बनवल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वत: ही माहिती दिली. ही लस आपल्या मुलीलाही देण्यात आल्याचे पुतिन यांनी म्हटले आहे.
ही लस घेतल्यानंतर कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढते, असे रशियाने म्हटले आहे. एएफपी नावाच्या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, पुतीन यांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये म्हटले की, कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीचा पहिला डोस आज सकाळी देण्यात आला. पुढे बोलताना पुतिन यांनी म्हटले की, त्यांच्या मुलीसाठीही या लसीचा वापर करण्यात आला आहे.
रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही कोरोनावरील या लसीला मान्यता देण्यात आली आहे. ही लस मॉस्कोच्या गामेल्या इंस्टिट्यूटने विकसित केली आहे. मंगळवारी रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने ही लस यशस्वी ठरल्याचे सांगितले आहे. त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांनी घोषित केले आहे की, लवकरच रशिया या लसीच्या उत्पादनाचे काम सुरू करेल.
अलीकडेच व्लादिमीर पुतीन यांच्या दोन मुलींपैकी एकीला कोरोनाची लागण झाली होती. तिच्यावरील उपचारादरम्यान मुलीला ही नवीन लस देण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.