मॉस्को - गेल्या 24 तासांत रशियामध्ये 18 हजार 140 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यानंतर, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून 16 लाख 18 हजार 116 झाली आहे. तर, याच काळात 334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आतापर्यंत रशियात कोरोनाच्या बळींची संख्या 27 हजार 990 झाली आहे.
हेही वाचा - न्यूयॉर्कमधील विमानतळांवर मास्क न घातल्यास होणार 50 डॉलर्सचा दंड
मॉस्को शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथे एका दिवसभरात 4 हजार 952 नवीन कोरोना प्रकरणे समोर आली. यासह मॉस्कोमधील एकूण कोरोना प्रकरणांची संख्या 4 लाख 24 हजार 148 वर गेली.
देशाच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 12 लाख 15 हजार 414 रुग्ण कोविड - 19 मधून बरे झाले आहेत. येथे एका दिवसात सर्वाधिक 14 हजार 854 रुग्णही बरे होऊन घरी गेले आहेत.
आतापर्यंत रशियामध्ये 60 दशलक्षाहून अधिक नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
हेही वाचा - अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 1 फेब्रुवारीपर्यंत 4 लाखांवर पोहोचण्याचा अंदाज