मॉस्को - रशियात मागील 24 तासांत 20 हजार 977 नवीन कोरोना विषाणूबाधितांची नोंद झाली आहे. यासह, देशातील एकूण प्रकरणांची संख्या वाढून 18 लाख 17 हजार 109 झाली. देशाच्या कोविड - 19 प्रतिसाद केंद्राने ही माहिती दिली.
सिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, रशियामध्ये गेल्या 24 तासांत 368 लोकांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 31 हजार 161 लोकांनी कोरोना संक्रमणामुळे आपले प्राण गमावले आहेत.
मॉस्कोमध्ये 5 हजार 902 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासह संक्रमित लोकांची एकूण संख्या 4 लाख 81 हजार 68 झाली.
हेही वाचा - इटलीमध्ये कोविडच्या 25 हजाराहून अधिक नवीन घटनांमध्ये आतापर्यंत 41,750 मृत्यू
15 हजार 600 लोक कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. आतापर्यंत 13 लाख 50 हजार 741 रुग्ण बरे झाले आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून रशियामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
आरोग्यमंत्री मिखाईल मुराशको यांनी सोमवारी सांगितले की, रशियामधील रुग्णालयातील 82 टक्के बेड कोरोना रुग्णांनी भरलेले आहेत.
हेही वाचा - पोर्तुगाल कोरोनामुळे पुन्हा एकदा 'आपात्कालीन स्थिती'त