स्टॉकहोम - भारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासह ईस्टर डुफलो आणि मायकल क्रेमर या दोन अर्थशास्त्रज्ञांनाही संयुक्तरीत्या हा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
-
BREAKING NEWS:
— The Nobel Prize (@NobelPrize) October 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The 2019 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel has been awarded to Abhijit Banerjee, Esther Duflo and Michael Kremer “for their experimental approach to alleviating global poverty.”#NobelPrize pic.twitter.com/SuJfPoRe2N
">BREAKING NEWS:
— The Nobel Prize (@NobelPrize) October 14, 2019
The 2019 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel has been awarded to Abhijit Banerjee, Esther Duflo and Michael Kremer “for their experimental approach to alleviating global poverty.”#NobelPrize pic.twitter.com/SuJfPoRe2NBREAKING NEWS:
— The Nobel Prize (@NobelPrize) October 14, 2019
The 2019 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel has been awarded to Abhijit Banerjee, Esther Duflo and Michael Kremer “for their experimental approach to alleviating global poverty.”#NobelPrize pic.twitter.com/SuJfPoRe2N
मूळ भारतीय वंशाचे असलेले अभिजित बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल मिळाला आहे. हा नोबेल त्यांना पत्नी इस्थर डफ्लो आणि अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांच्यासमवेत संयुक्तपणे मिळाला आहे. बॅनर्जी हे अमेरिकेमधील एमआयटीच्या फोर्ड फाउंडेशन इंटरनॅशनलमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहेत.
अभिजित बॅनर्जी यांचा मुंबईमध्ये १९६१ मध्ये जन्म झाला. त्यांना 'जागतिक गरिबी दूर हटविण्यासाठी प्रयोगात्मक दृष्टीकोन' या विषयावर अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाला आहे. ५८ वर्षीय बॅनर्जी यांनी हॉवर्ड विद्यापीठातून १९८८ मध्ये पीएच. डी. मिळविली आहे. कोलकाता विद्यापीठात तसेच दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधून त्यांनी शिक्षण घेतले आहे.