ETV Bharat / international

पाकिस्तान भारताशी युद्ध करण्याच्या परिस्थितीत नाही - आयेशा सिद्दीक

'मी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात माझ्या एका मित्राशी संवाद साधत होते. मी त्याला आमचे सैन्य लढाईस सुरुवात का करत नाही, असा प्रश्न केला. तो म्हणाला की, आपण युद्ध हरू. आता, सर्वसामान्य लोकांनाही समजू शकते की, भारताशी युद्ध करण्याची ही योग्य वेळ नाही,' असे आयेशा यांनी व्हिडिओद्वारे संवाद साधताना म्हटले.

आयेशा सिद्दीक
author img

By

Published : Aug 19, 2019, 3:42 PM IST

लंडन - 'पाकिस्तानसह त्यांचे लष्कर सध्या काश्मीर प्रकरणावरून भारताशी युद्ध करण्याच्या परिस्थितीत नाहीत. पाकमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच, पाकची अर्थव्यवस्थाही अगदी तोळामासा झाली आहे. त्यामुळे पाकने अशा प्रकारचे पाऊल उचलल्यास सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते,' असे पाकिस्तानी लष्करी व्यवहार तज्ज्ञ आणि लेखक आयेशा सिद्दीक यांनी म्हटले आहे.

आयेशा यांनी 'मिलिटरी आयएनसी : इनसाईड पाकिस्तान्स मिलिटरी इकॉनॉमी' हे पुस्तक लिहिले आहे. भारताने काश्मीरशी संबंधित आर्टिकल ३७० आणि आर्टिकल ३५ ए रद्द केले. यासंदर्भात बोलताना सिद्दीक यांनी वरील विधान केले.

'मी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात माझ्या एका मित्राशी संवाद साधत होते. मी त्याला आमचे सैन्य लढाईस सुरुवात का करत नाही, असा प्रश्न केला. तो म्हणाला की, आपण युद्ध हरू. आता, सर्वसामान्य लोकांनाही समजू शकते की, भारताशी युद्ध करण्याची ही योग्य वेळ नाही,' असे आयेशा यांनी व्हिडिओद्वारे संवाद साधताना म्हटले.

'प्रथमच सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकालाही समजत आहे की, युद्ध शक्य नाही. याचे खोलवर दुःख आहे. मात्र, काहीच पर्याय नाही. आता पाक लष्कर कशी प्रतिक्रिया देते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मागील ७२ वर्षे पाकिस्तानी सैन्याने काश्मीर आणि भारतावरच लक्ष केंद्रीत केले होते. एका दिवस ते अचानक जागे झाले आणि त्यांनी समजले की, काहीच शिल्लक उरलेले नाही. सध्या पाकिस्तानी सैन्यात काही असे गट आहेत, जे अत्यंत दु:खी आणि रागाने पेटून उठलेले आहेत. ते यावर नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित करतील,' असे सिद्दीक म्हणाल्या.

Intro:Body:

-----------------

पाकिस्तान भारताशी युद्ध करण्याच्या परिस्थितीत नाही - आयेशा सिद्दीक

लंडन - 'पाकिस्तान त्यांचे लष्कर सध्या काश्मीरप्रकरणी भारताशी युद्ध करण्याच्या परिस्थितीत नाहीत. पाकमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच, पाकची अर्थव्यवस्थाही अगदी तोळामासा झाली आहे. त्यामुळे पाकने अशा प्रकारचे पाऊल उचलल्यास सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते,' असे पाकिस्तानी लष्करी व्यवहार तज्ज्ञ आणि लेखक आयेशा सिद्दीक यांनी म्हटले आहे.

आयेशा यांनी 'मिलिटरी आयएनसी : इनसाईड पाकिस्तान्स मिलिटरी इकॉनॉमी' हे पुस्तक लिहिले आहे. भारताने काश्मीरशी संबंधित आर्टिकल ३७० आणि आर्टिकल ३५ ए रद्द केले. यासंदर्भात बोलताना सिद्दीक यांनी वरील विधान केले.

'मी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात माझ्या एका मित्राशी संवाद साधत होते. मी त्याला आमचे सैन्य लढाईस सुरुवात का करत नाही, असा प्रश्न केला. तो म्हणाला की, आपण युद्ध हरू. आता, सर्वसामान्य लोकांनाही समजू शकते की, भारताशी युद्ध करण्याची ही योग्य वेळ नाही,' असे आयेशा यांनी व्हिडिओद्वारे संवाद साधताना म्हटले.

'प्रथमच सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकालाही समजत आहे की, युद्ध शक्य नाही. याचे खोलवर दुःख आहे. मात्र, काहीच पर्याय नाही. आता पाक लष्कर कशी प्रतिक्रिया देते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मागील ७२ वर्षे पाकिस्तानी सैन्याने काश्मीर आणि भारतावरच लक्ष केंद्रित केले होते. एका दिवस ते अचानक जागे झाले आणि त्यांनी समजले की, काहीच शिल्लक उरलेले नाही. सध्या पाकिस्तानी सैन्यात काही असे गट आहेत, जे अत्यंत दु:खी आणि रागाने पेटून उठलेले आहेत. ते यावर नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित करतील,' असे सिद्दीक म्हणाल्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.