लंडन - ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेका कंपनीची कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सिन अंतिम टप्प्यातील चाचणीला ब्रिटनमध्ये पुन्हा सुरुवात केली आहे. एस्ट्राजेनेकाने सांगितले, की ब्रिटनच्या मेडिसिन्स हेल्थ रेग्युलेटरी अथॉरिटीने ही लस सुरक्षित असल्याचा दावा केल्यानंतर पुढच्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी देण्यात आली. ६ सप्टेंबरला एका स्वंयसेवकाची तब्येत बिघडल्यानंतर व्हॅक्सिनच्या चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या.
ऑक्सफोर्ड विद्यापीठ व एस्ट्राजेनेकाने म्हटले आहे, की एमएचआरए द्वारे परीक्षणाला सुरक्षित असल्याचा दावा केल्यानंतर एस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्डने ब्रिटनमध्ये कोरोना व्हयरस लस AZ1222 ची चाचणी सुरू करण्यात आली. कंपनी जगभरातील आरोग्य संघटनांबरोबर काम सुरू ठेवेले व त्यांना सूचित करेल, की लसीच्या पुढल्या टप्प्यातील चाचण्या कधी सुरू करायच्या आहेत.
2020 च्या शेवटपर्यंत येऊ शकते व्हॅक्सिन -
एस्ट्राजेनेकाचे सीईओ पास्कल सॉरियट यांनी लस लवकरात लवकर निर्माण होण्याची आशा व्यक्त केली आहे. त्यांचे अनुमान आहे, की ही व्हॅक्सिन या वर्षीच्या शेवटपर्यंत किंवा पुढील वर्षी सुरुवातीला लस बाजारात येऊ शकते. सॉयरिट यांनी म्हटले, की संपूर्ण जगाची नजर या लसीकडे लागली आहे.
व्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान एका स्वंयसेवकाची तब्येत बिघडली होती. या टप्प्यात जगभरातील ५० हजारहून अधिक लोक सामील झाले होते. व्हॅक्सिनचा चौथा टप्पा पूर्ण केल्यानंतर याची सुरक्षितता आणि परिणाम याची तपासणी केली.