म्युनिच - जगभरातील सर्वच देश अधिकाधिक राष्ट्रवादी बनत चालले आहेत. यातून अमेरिका आणि चीनसुद्धा सुटलेले नाहीत. या कारणामुळे जगभरातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये राष्ट्रवादी विचारांची सरकारे उदयाला येत आहेत. यामुळे जग वैचारिक आणि बहुपक्षीय राजकारणातील वैविध्य हरवत चालले आहे. सर्व जगालाच एकसुरीपणा येत आहे, असे भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले. ते जर्मनीतील म्युनिच सुरक्षा परिषदेत बोलत होते.
'कशामुळे जगातील बहुढंगीपणा नाहीसा होत आहे? जगभरातील आर्थिक संतुलन पुन्हा प्रस्थापित होत असतानाच यामुळे राजकीय संतुलनही आपोआप बदलले जाऊन ते पुनर्स्थापित होत आहे. यामुळे विविध कंगोरे नाहीसे होऊन विविधांगी असलेले जग एकांगी बनत आहे,' असे जयशंकर म्हणाले. 'मागील २० वर्षांमध्ये आपण जगभरात आर्थिक समतोल पुन्हा स्थापन झालेला पाहिला आहे. त्याचेच रूपांतर राजकीय उलटफेर होऊन त्यामध्ये नवा समतोल निर्माण होण्यात होत आहे. असे घडत असेल तर, सध्या आपण संक्रमणाच्या युगात आहोत,' असे विचार त्यांनी मांडले.
'जग अधिकाधिक राष्ट्रवादी बनत चालले आहे, यात काही संशय नाही. ही बाब निवडणूक प्रक्रियांमधूनही सिद्ध झाली आहे. जगभरातील देशांमध्ये राष्ट्रवादी विचारांची सरकारे सत्तेत आली आहेत. यामध्ये सकारात्मक राष्ट्रवादाचे उदाहरण प्रस्थापित करणारे देशही आहेत. यामुळे अधिक राष्ट्रवादी बनल्यामुळे जगातील बहुपक्षीयता लुप्त होत आहे,' असे जयशंकर म्हणाले.
'संयुक्त राष्ट्रांची इतिहासात पूर्वी कधी नव्हती तितकी विश्वासार्हता कमी झाली आहे. सध्या जगात ७५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या आणि सुस्थितीत असलेल्या फारशा बाबी अस्तित्वात नाहीत. यावरून या बाबतीत काहीतरी केले गेले पाहिजे, हेच सिद्ध होत आहे,' असे ते म्हणाले.