ETV Bharat / international

जर्मनीत अंदाधुंद गोळीबार, ६ जणांचा मृत्यू - रॉट अ‍ॅम सी शहर गोळीबार

जर्मनीतील स्टटगार्ट प्रांतातील रॉट अ‍ॅम सी शहरात अंदाधुंद गोळीबारामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

रॉट अ‍ॅम सी गोळीबार
रॉट अ‍ॅम सी गोळीबार
author img

By

Published : Jan 25, 2020, 10:25 AM IST

बर्लिन - जर्मनीतील स्टटगार्ट प्रांतातील रॉट अ‍ॅम सी शहरात अंदाधुंद गोळीबारामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री उशीरा घडली. याप्रकरणी एका संशयीत व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

या गोळीबारामध्ये सहा जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मिळाल्याचे पोलिसांचे प्रवक्ते रुडॉल्फ बेहल्माइर यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले. एकाच व्यक्तीने हे कृत्य केले असावे, दुसरा व्यक्ती या हल्ल्यात सहभागी असल्याचे पुरावे सापडले नाही, तसेच संशयित हा पीडित व्यक्तींना ओळखत असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Intro:Body:

जर्मनीत अंदाधुद गोळीबारामध्ये ६  जणांचा मृत्यू

बर्लिन : जर्मनीतील स्टटगार्ट प्रांतातील रॉट अ‍ॅम सी शहरात अंदाधुंद गोळीबारामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी एका संशयीत व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.  

या गोळीबारामध्ये सहा जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मिळाल्याचे पोलिसांचे प्रवक्ते रुडॉल्फ बेहल्माइर यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले. एकाच व्यक्तीने हे कृत्य केले असावे, दुसरा व्यक्ती या हल्ल्यात सहभागी असल्याचे पुरावे सापडले नाही, तसेच संशयीत हा पीडित व्यक्तींना ओळखत असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.