ETV Bharat / international

इटली, स्पेनमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाखांच्या पुढे; 21 हजार मृत्यू - इटली कोरोना

इटलीमध्ये एक लाख 5 हजार 792 जणांना कोरोनाची लागण झाली असून स्पेनमध्ये 1 लाख 2 हजार 136 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

इटली कोरोना
इटली कोरोना
author img

By

Published : Apr 1, 2020, 10:03 PM IST

रोम - चीनमध्ये प्रथम आढळून आलेल्या कोरोना विषाणूचा जगभरामध्ये प्रसार झाला आहे. चीननंतर युरोपमध्ये सर्वात जास्त कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. इटली, स्पेन या देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आत्तापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त इटली आणि स्पेनमध्ये आढळून आले असून 21 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

इटलीमध्ये 1 लाख 5 हजार 792 जणांना कोरोनाची लागण झाली असून स्पेनमध्ये 1 लाख 2 हजार 136 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरामध्ये सर्वात जास्त मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. 12 हजार 428 जणांचा इटलीत मृत्यू झाला असून स्पेनमध्ये 9 हजार 53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर इटलीत सुमारे 15 हजार आणि स्पेनमध्ये 22 हजार नागरिक पुर्णत: बरे झाले आहेत.

जगभरात 200 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. त्यामुळे अनेक देशांनी संचारबंदी लागू केली आहे. व्यापार, पर्यटन, वाहतूक, बाजारपेठा ठप्प झाल्या असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. चीनमधील वुहान प्रांतामध्ये सर्वात जास्त कोरोनाग्रस्त आढळून आले होते. मात्र, आता चीन कोरोना आपत्तीतून बाहेर निघाला असून फक्त 2 हजार जणांना आता कोरोनाचा संसर्ग झाला आहे. युरोपातील जर्मनी, फ्रान्समध्येही 60 हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.