नार्वे - जगात अनेक गोष्टी अशा घडतात. ज्यावर लोकांना विश्वास ठेवणे कठिण जाते. आज आम्ही तुम्हाला अशा एका शहराबद्दल सांगणार आहोत, जिथे मृत्यूवर बंदी घालण्यात आली असून गेल्या 70 वर्षांत एकही मृत्यू झाला नाही. तुम्हाला हे विचित्र वाटेल, विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरं आहे. हे अनोखे ठिकाण नॉर्वे मध्ये आहे. नॉर्वेमधील नाव लाँग इअरबेनमध्ये गेल्या 70 वर्षांपासून एकही मृत्यू झालेला नाही. यामागे एक विशेष असे कारण देखील आहे.
लॉंग इअरबेन शहरातील प्रशासनाने एक विचित्रच कायदा केला आहे. ज्यामुळे या ठिकाणी 70 वर्षांपासून एकही मृत्यू झालेला नाही. तो कायदा म्हणजे, येथे चक्क मानवांच्या मृत्यूवरच बंदी घालण्यात आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, जन्माला आला तो मरणार हा निसर्गाचा नियम आहे. मग या शहरात मृत्यू कसे होत नाहीत. तर ते असे, की नॉर्वेच्या उत्तर ध्रुवावर स्थित असलेल्या लाँग इअरबेनमध्ये वर्षभर कडाक्याची थंडी असते. ज्यामुळे येथे मृतदेह विघटित होत नाहीत. यामुळे येथील प्रशासनाने मानवांच्या मृत्यूवर बंदी घातली आहे. एखादी व्यक्ती जर या ठिकाणी आजारी पडली. तर त्या व्यक्तीला विमानाने दुसऱ्या ठिकाणी नेले जाते. त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीवर उपचार होतात आणि मृत्यूनंतर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात. सर्व नागरिकांना मृत्यूपुर्वीच शहराच्या बाहेर हलवले जाते. त्यामुळेच या शहरात 70 वर्षांपासून एकही मृत्यू झालेला नाही.
का घातली मानवांच्या मृत्यूंवर बंदी -
लाँग इअरबेन या शहरात 2000 लोकसंख्या आहे. ख्रिस्ती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. वर्ष 1917 मध्ये, इन्फ्लूएन्झा ग्रस्त एका व्यक्तीचा या ठिकाणी मृत्यू झाला होता. त्या माणसाचा मृतदेह लाँग इअरबेनमध्ये पुरला गेला होता. पण त्याच्या शरीरात अद्याप देखील इन्फ्लूएन्झा व्हायरस असल्याची माहिती समोर आली. यामुळे, प्रशासनाने येथे मानवांच्या मृत्यूवर बंदी घालण्यात आली.
हेही वाचा - धोक्याची घंटा वाजली! चीन आणि रशियामध्ये कोरोनाचा; लॉकडाऊन पुन्हा लागू