ETV Bharat / international

Russia Ukraine Crisis : 'युद्ध सुरुयं, मला शस्त्र द्या, पळ काढण्यासाठी विमान नाही'; युक्रेन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेची ऑफर फेटाळली - रशिया आणि युक्रेन युद्ध अपडेट

अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना कीव सोडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कीव सोडण्यासाठी विमान पाठवण्याची ऑफरही दिली आहे. पण वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा ‘एक्झिट प्लान’ ( Volodymyr Zelenskyy declines US offer to evacuate Kyiv )नाकारला आहे. युद्ध सुरू असताना देश सोडून पळून जाण्यासाठी विमान नाही, तर मला शस्त्रे पुरवा, असे म्हणत वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शेवटच्या श्वावासापर्यंत रशियन सैनिकांविरोधात निकारने लढत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करत आप कीवध्येच राहणार असल्याचं स्पष्टपणे सांगतिले.

I need ammunition, not a ride: Ukraine President Volodymyr Zelenskyy declines US offer to evacuate Kyiv
Volodymyr Zelenskyy declines US offer to evacuate Kyiv
author img

By

Published : Feb 26, 2022, 2:22 PM IST

कीव - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध ( Russia Ukraine Crisis ) पुकारले आहे. युक्रेनचे सैनिक जिगरीने लढत असून देश वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना कीव सोडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कीव सोडण्यासाठी विमान पाठवण्याची ऑफरही दिली आहे. पण वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा ‘एक्झिट प्लान’ ( Volodymyr Zelenskyy declines US offer to evacuate Kyiv )नाकारला आहे. युद्ध सुरू असताना देश सोडून पळून जाण्यासाठी विमान नाही, तर मला शस्त्रे पुरवा, असे म्हणत वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शेवटच्या श्वावासापर्यंत रशियन सैनिकांविरोधात निकारने लढत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करत आप कीवध्येच राहणार असल्याचं स्पष्टपणे सांगतिले.

युक्रेनच्या संरक्षण विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून झेलेन्स्की यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. देशातील सर्व नागरिक, सैन्य येथे आहेत. आम्ही सर्वजण आमच्या देशाचे संरक्षण करत असून येथेच राहणार आहोत, असे त्यांनी म्हटलं. रशियन सैन्य कीवमध्ये घुसल्यानंतर झेलेन्स्की भूमीगत झाल्याचे वृत्त आले होते. पण, व्हिडिओ शेअर करत आपण सैन्यासोबत खुलेआम फिरत असून बैठका घेत असल्याने त्यांनी सांगितले. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते कीवमधील एका इमारतीसमोर उभे असल्याचे दिसून येते.

पुतीन यांच्या युद्धाच्या निर्णयाचा अमेरिकेने निषेध नोंदवला आहे. रशियाच्या या निर्णयावर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी चांगलेच संतापलेले दिसत आहेत. अमेरिका आणि ब्रिटननेही रशिया आणि युक्रेन या दोन्ही प्रदेशांवर कडक निर्बंध लादण्यास सुरवात केली.

युक्रेनचे महत्त्व -

युक्रेन हा भारतासारखाच बहुभाषिक देश असून रशिया आणि युक्रेनियन लोकांचा वंश एकच म्हणजे स्लॉव्ह आहे. मात्र, या देशाचे दोन ठळक भाग आहेत. पश्चिमेकडील भागावर युरोपचा मोठा प्रभाव आहे. तर पूर्वेकडील भागावर रशियाचा प्रभाव आहे. युक्रेन हा युरोप आणि रशिया यांच्या दरम्यान असल्याने दोन्ही तो आपल्या प्रभावाखाली असावा, असे युरोपीय देश आणि रशिया या दोघांनाही वाटते. आर्थिक कारणांबरोबरच सामरिक कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. आता पुतीन यांनी युद्ध पुकारल्याने हे युरोपातील 1945 नंतरचं सगळ्यात मोठं युद्ध असेल. केवळ युक्रेनची नव्हे तर रशियाचीही या युद्धात मोठी जीवितहानी होऊ शकते.

हेही वाचा - Russia Ukraine crisis : तुमच्या हातात सत्ता घ्या, व्लादिमीर पुतीन यांचे युक्रेनच्या सैन्यदलाला आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.