लंडन - बलुचिस्तानी नागरिकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या तीन मानवी हक्क संघटनांनी एका परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद लंडन येथे ११ डिसेंबरला होणार आहे. या एकदिवसीय परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सध्या बलुचिस्तानची स्थिती बिकट होत चालली आहे. पाकिस्तानी सरकारकडून येथे मानवी हक्क उल्लंघनाच्या अनेक घटना घडत आहेत. बलुच नागरिकांवरील हल्ल्यांचे प्रकार मागच्या काही दिवसांपासून वाढले आहेत. काही ठिकाणी तर नरसंहाराच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. यामुळे बलुचिस्तानी नागरिकांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे.
हेही वाचा - पेट्रोल भाववाढीविरोधाच्या आंदोलनाचा भडका, इराणमध्ये पेट्रोलची तिप्पट दरवाढ
या परिषदेत बलुचिस्तानमधील अशा अनेक घटनांवर चर्चा होणार आहे. बलुची नागरिक आणि सरकारमधील संघर्ष, राजकीय दडपशाही, छळवणूक आणि न्यायबाह्य हत्या, बालके आणि महिलांविरोधातील हिंसा, सरकार पुरस्कृत हिंसा असे अनेक विषय चर्चिले जाणार आहेत.
हेही वाचा - इस्रायलचा गाझावर हल्ला, 'हमास'च्या अड्ड्यांवर डागला निशाणा
अपहरण, छळवणूक आणि न्यायबाह्य हत्यांमध्ये पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआय ही गुप्तहेर संस्था सामील आहे, असे मानवी हक्क कार्यकर्त्यांचे मत आहे. आतापर्यंत हजारो बलुच तरुण, महिलांचे अपहरण झाले आहे. त्यांच्या सुटकेसाठी बलुचीस्तानच्या रस्त्यांवर दररोज निदर्शने होत असतात.