ETV Bharat / international

'पाकिस्तानमध्ये 828 हिंदू मंदिरांपैकी शिल्लक राहिलीत केवळ 20 मंदिरे'

author img

By

Published : Oct 11, 2020, 5:01 PM IST

Updated : Oct 11, 2020, 7:08 PM IST

लंडन स्थित पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या अनिला गुलजार यांनी पाकिस्तान सरकारवर टीका केली आहे. पाकिस्तानात 828 पैकी फक्त 20 मंदिरेच बाकी आहेत, असे त्या म्हणाल्या.

पाकिस्तान
पाकिस्तान

लंडन - अल्पसंख्याक सुरक्षित नसल्यावरून पाकिस्तान नेहमीच संयुक्त राष्ट्राच्या सभेत तोंडशी पडला आहे. पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिराना लक्ष्य करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यासंदर्भात लंडन स्थित पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या अनिला गुलजार यांनी पाकिस्तान सरकारवर टीका केली आहे. पाकिस्तानात 828 पैकी फक्त 20 मंदिरेच बाकी आहेत, असे त्या म्हणाल्या. काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रदेशात हिंदू मंदिराची तोडफोड झाली होती. यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानातील अल्पसंख्याकाच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

काही अज्ञात समाजकंटकांनी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात 10 ऑक्टोबरला एका हिंदू मंदिराची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचा अनिला गुलजार यांनी निषेध व्यक्त केला. पाकिस्तानमध्ये हिंदूंचा सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. परंतु, हिंदू मंदिरांबद्दल तोडफोड केल्याच्या वारंवार बातम्या येत आहेत. या हल्ल्याबद्दल हिंदू समाजातून संताप व्यक्त होत आहे. फक्त मंदिराची तोडफोड करण्यात येत नाही. तर हिंदू मुलींना धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.

तथापि, पाकिस्तानकडून नेहमीच भारतावर काश्मीरमधील अल्पसंख्यांकाचा प्रश्नांवरून टीका करण्यात येते. मात्र, पंतप्रधान इम्रान खान हे स्वत:च्या देशातील अल्पसंख्यांचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानातील अनेक पुरातन हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. इस्लामाबाद शहरात तर हिंदूंसाठी एकही मंदिर नाही. त्यामुळे शहरात मंदिर बांधण्याची मागणी पाकिस्तानातील हिंदू संघटनांकडून होत होती.

Last Updated : Oct 11, 2020, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.