ETV Bharat / international

चिल डोनाल्ड... ग्रेटा थनबर्गचे ट्रम्प यांना जशाच तसे उत्तर, वाचा काय म्हणाली...

author img

By

Published : Nov 6, 2020, 3:52 PM IST

स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने डोनाल्ड ट्रम्पवर त्यांच्याचं शब्दात निशाणा साधला. ग्रेटाने डोनाल्ड ट्रम्प यांना रागावर नियंत्रण मिळवण्याचा सल्ला दिला आहे.

ग्रेटा
ग्रेटा

वॉशिंग्टन डी. सी. - अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निकाल अद्याप येणे बाकी आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आघाडीवर आहेत. मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप विद्यामान राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यांनी मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्यासाठी न्यायालयामध्ये धावही घेतली. मात्र, जॉर्जिया आणि मिशिगनमधल्या न्यायाधीशांनी डोनाल्ड ट्रम्प यांची यांची याचिका फेटाळली आहे. यातच स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने डोनाल्ड ट्रम्पवर त्यांच्याच शब्दात निशाणा साधला.

  • So ridiculous. Greta must work on her Anger Management problem, then go to a good old fashioned movie with a friend! Chill Greta, Chill! https://t.co/M8ZtS8okzE

    — Donald J. Trump (@realDonaldTrump) December 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ग्रेटा थनबर्गने ट्रम्प यांना त्यांच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे.' किती हा पोरकटपणा, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी थोडे काम केले पाहिजे. ट्रम्प यांनी आपल्या एखाद्या चांगल्या मित्राबरोबर छानसा जुना चित्रपट पाहावा, थोड शांत व्हा ट्रम्प, असे टि्वट ग्रेटाने केले आहे. ट्रम्प यांचे 'मतमोजणी थांबवा', हे टि्वट तीने रिटि्वट केले आहे.

  • So ridiculous. Donald must work on his Anger Management problem, then go to a good old fashioned movie with a friend! Chill Donald, Chill! https://t.co/4RNVBqRYBA

    — Greta Thunberg (@GretaThunberg) November 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले होते ट्रम्प?

16 वर्षीय ग्रेटाला राजकीय स्तरावर हवामान बदलाविषयी तातडीने पावले उचलण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल ‘टाइम मॅगझीन’ने ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित केले होते. तेव्हा अनेकांनी ग्रेटाचे अभिनंदन केले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रेटाला रागावर नियंत्रण मिळवण्यासंदर्भात सल्ला दिला होता.

कोण आहे ग्रेटा थनबर्ग?

पर्यावरण विषयावर जगाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रेटाने सोशल मीडियावर 'फ्रायडे फॉर फ्युचर' ही मोहीम उभारली आहे. या मोहिमेला जगभरातील विविध देशांमधून मोठे समर्थन मिळत आहे. ग्रेटा जगातील पर्यावरणीय चळवळीची आंतरराष्ट्रीय राजदूत झाली. 2018च्या डिसेंबरमध्ये पोलंडच्या कॅटोविस शहरातील जागतिक हवामान परिषदेस संबोधित करण्याचा मान शाळकरी ग्रेटाला मिळाला आणि 200 राष्ट्रांच्या प्रमुखांना तिने जाहीर फटकारले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.