लंडन - स्वीडनची पर्यावरणवादी १७ वर्षीय ग्रेटा थनबर्गन आणि २२ वर्षीय नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफजाई यांची प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठात मंगळवारी भेट झाली. दोघींनीही ट्विटरवरून भेट झाल्याची माहिती फोटोसह शेअर केली आहे. लेडी मार्गारेट हॉलमध्ये ग्रेटा आली असताना तेथे दोघींची भेट झाली.
ब्रिस्टोल येथे या आठवड्यात होणाऱ्या शाळकरी मुलांच्या आंदोलनात ग्रेटा सहभागी होणार आहे. तर युसूफजाई ऑक्सफर्ड विद्यापीठात राजकारण, तत्वज्ञान आणि अर्थशास्त्र शिकत आहे. मलालाने 'ती एकमेव मैत्रीण आहे, जिच्यासाठी मी शाळा सोडू शकते', असे ट्विट भेटीनंतर केले आहे. तर ग्रेटाने, अखेर आज मी माझ्या आदर्श व्यक्तीला भेटले, आणखी काय बोलू शकते, असे म्हणत ग्रेटाने भेटीबद्दल माहिती दिली आहे. मात्र, या दोघींमध्ये नेमकी कोणत्या गोष्टीवर चर्चा झाली, याची माहिती समजू शकली नाही.
-
She’s the only friend I’d skip school for. pic.twitter.com/uP0vwF2U3K
— Malala (@Malala) February 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">She’s the only friend I’d skip school for. pic.twitter.com/uP0vwF2U3K
— Malala (@Malala) February 25, 2020She’s the only friend I’d skip school for. pic.twitter.com/uP0vwF2U3K
— Malala (@Malala) February 25, 2020
लेडी मार्गारेट हॉलचे प्राचार्य अॅलन रसब्रिगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटाने आपल्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी “विज्ञान, मतदान, आंदोलनाच्या मर्यादा, डायवेस्टमेंट इत्यादी विषयांवर संवाद साधला. सर्वांच्या न्याय, सत्य आणि समानतेसाठी उभ्या असलेल्या दोन शक्तिशाली तरुणी, अशा भाषेत येथील व्याख्याते जेनिफर कॅसिडी यांनी दोघींचे कौतुक केले.
हेही वाचा - पर्यावरण वाचवण्याच्या 'तिच्या' आंदोलनाला मोठं बळ; हमबर्गमध्ये ६० हजार नागरिक रस्त्यावर
पर्यावरण वाचवण्यासाठी 'फ्रायडे फॉर फ्युचर' या मोहिमेखाली दोन वर्षांपूर्वी ग्रेटाने सुरू केलेल्या आंदोलनाला आता जगभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच जर्मनीच्या हमबर्ग शहरात 'फ्रायडे फॉर फ्युचर' मोहिमेंतर्गत करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये जवळपास ६० हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. स्वीडनच्या संसदेसमोर उभारून केलेल्या आंदोलनानंतर ग्रेटा चर्चेत आली. २०१९ मध्ये टाइम मासिकाने 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार देऊन ग्रेटाच्या कामाची जणू पावतीच दिली होती. पर्यावरण वाचवण्याच्या मोहिमेत आज जगभरातील करोडो मुलांचा आवाज बनून ग्रेटा काम करत आहे.
-
So... today I met my role model. What else can I say? @Malala pic.twitter.com/n7GnXUngov
— Greta Thunberg (@GretaThunberg) February 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">So... today I met my role model. What else can I say? @Malala pic.twitter.com/n7GnXUngov
— Greta Thunberg (@GretaThunberg) February 25, 2020So... today I met my role model. What else can I say? @Malala pic.twitter.com/n7GnXUngov
— Greta Thunberg (@GretaThunberg) February 25, 2020
वर्ष २०१४ मध्ये सर्वात कमी वयात (१७) शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारी मलाला युसूफजाई पहिली महिला ठरली होती. मलालाने मुस्लीम मुलींना शाळेत जाण्याची संधी मिळावी, यासाठी दीर्घकाळ आंदोलन केले होते. २०१२ मध्ये, मलाला शाळेतून घरी परत येत असताना तालिबानी अतिरेक्यांनी तिच्या डोक्यात आणि खांद्यावर गोळी मारली होती. मात्र, सुदैवाने यातून ती बचावली. पाकिस्तानमधील नागरी हक्कांसाठी सध्या ती काम करत आहे.
हेही वाचा - 'मलाला'वर गोळ्या झाडणारा तालिबानी फरार..?