ETV Bharat / international

महात्मा गांधींच्या चष्म्याचा इंग्लंडमध्ये लिलाव; 2 कोटी 55 लाखांची बोली

author img

By

Published : Aug 23, 2020, 4:46 PM IST

महात्मा गांधी यांच्या चष्म्याचा लिलाव इंग्लंडमधील ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन कंपनीकडून शुक्रवारी करण्यात आला. महात्मा गांधीच्या या चष्म्याचा लिलाव 2 लाख 60 हजार पौंड इतक्या किमतीला झाला. हा चष्मा महात्मा गांधी यांनी एका व्यक्तीला दक्षिण आफ्रिकेत असताना दिला होता.

Gandhi's glasses
महात्मा गांधींच्या चष्म्याचा लिलाव

लंडन- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चष्म्याचा लिलाव शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने इंग्लंडमध्ये झाला. या लिलावात चष्म्याची खरेदी करण्यासाठी 2 लाख 60 हजार पौंड इतकी बोली लावण्यात आली. भारतीय चलनात याची किंमत 2 कोटी 55 लाख रुपये होते. महात्मा गांधींच्या या चष्म्याच्या कडांवर सोन्याचा मुलामा लावलेला आहे. ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन हाऊसतर्फे या चष्म्याचा लिलाव 21 ऑगस्टला करण्यात आला.

ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन कंपनीला या चष्म्याचा लिलाव 14 हजार 500 पौंड या किमतीला होईल, असा अंदाज होता. मात्र, लिलावादरम्यान किंमत वाढत जाऊन 2 लाख 60 हजार पौंड इतकी झाली. माझ्या सहकाऱ्याने मला हा चष्मा महात्मा गांधींचा असल्याचे सांगितले. लिलावासाठी आलेला चष्मा हा महात्मा गांधींचा असल्याचे समजताच आश्चर्याचा धक्का बसल्याचे ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन कंपनीचे लिलावकर्ते अ‌ॅण्ड्रयू स्टोव यांनी म्हणाले. आश्चर्यकारक वस्तूला आश्चर्यकारक किंमत मिळाल्याचे स्टोव यांनी सांगितले.

  • The moment Gandhi's Glasses sell for £260,000 (apologies for poor quality) - an incredible result for a very special pair of spectacles. A true honour and a real thrill to be a part of something so special. pic.twitter.com/HY6QqeHFvN

    — Andrew Stowe (@Auction_Andy) August 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर त्यांना लिलावासाठी दिलेल्या व्यक्तीने हा चष्मा त्यांच्या काकांना महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत दिला असल्याचे सांगितले असल्याचे नमूद केले आहे. विक्रेत्याचे काका दक्षिण आफ्रिकेत ब्रिटीश पेट्रोलियममध्ये नोकरीला होते. त्यांच्या चांगल्या कामासाठी महात्मा गांधी यांनी त्यांना चष्मा भेट दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.