ETV Bharat / international

इंग्लंडमध्ये अडकलेल्या विदेशी नागरिकांच्या व्हिसामध्ये १५ मेपर्यंत मुदतवाढ.. - लंडनमध्ये अडकलेल्या विदेशींचा व्हिसा वाढवला

कोरोना विषाणु महामारीमध्ये इंग्लंडमध्ये अडकलेल्या भारतीयांसह परदेशी नागरिकांना मोठा दिलासा देत, ज्यांच्यावर परिणाम झाला आहे त्यांच्या व्हिसाच्या मुदतीत १५ मेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये असलेल्या सर्व परदेशी नागरिकांना आणि २४ जानेवारीनंतर ज्याच्या व्हिसाची मुदत संपली आहे असे नागरिक आता आपल्या गृह कार्यालयात इमेल करून यावर्षीच्या ३१ मेपर्यंत मुदतवाढ प्राप्त करून घेऊ शकतील.

foreign nationals stuck in england got their Visa extended till 15th of may
इंग्लंडमध्ये अडकलेल्या विदेशी नागरिकांच्या व्हिसामध्ये १५ मेपर्यंत मुदतवाढ..
author img

By

Published : Apr 1, 2020, 5:54 PM IST

Updated : Apr 1, 2020, 7:03 PM IST

कोरोना विषाणु महामारीमध्ये इंग्लंडमध्ये अडकलेल्या भारतीयांसह परदेशी नागरिकांना मोठा दिलासा देत, ज्यांच्यावर परिणाम झाला आहे त्यांच्या व्हिसाच्या मुदतीत १५ मेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये असलेल्या सर्व परदेशी नागरिकांना आणि २४ जानेवारीनंतर ज्याच्या व्हिसाची मुदत संपली आहे असे नागरिक आता आपल्या गृह कार्यालयात इमेल करून यावर्षीच्या ३१ मेपर्यंत मुदतवाढ प्राप्त करून घेऊ शकतील. जागतिक लॉकडाऊन आणि प्रवासाच्या निर्बंधांमुळे जे परदेशी अडकलेल्या नागरिकांसाठी हा स्वागतार्ह निर्णय आहे. ज्या व्यक्ति इंग्लंडमध्ये आहेत आणि या वर्गात चपखल बसतात त्यांना CIH@homeoffice.gov.uk या मेलवर इमेल पाठवण्यास सांगितले आहे आणि त्यांच्या विस्तारित मुक्कामाच्या कारणाची रूपरेषा, त्यांचे नाव आणि मागील व्हिसाचा संदर्भ क्रमांक ही माहिती द्यावी लागेल. विनामूल्य हेल्पलाईन क्रमांक ०८००६७८१७६७ हा कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यरत असेल.

इंग्लंड लोकांचे आरोग्य आणि उत्तम स्थिती याला प्रथम स्थानी ठेवत आले आहे आणि कुणालाही त्यांच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीबद्दल शिक्षा केली जाणार नाही. लोकांच्या व्हिसाची मुदतवाढ करून, लोकांना आम्ही मनाची शांतता प्रदान करत आहोत आणि जे अत्यंत महत्वाच्या सेवेत आहेत तेही आपले काम सुरू ठेवतील, याची सुनिश्चिती करत आहोत, असे ब्रिटिश गृहमंत्री प्रिती पटेल यांनी सांगितले. अधिकार्यांनी असेही आश्वासन दिले आहे की आवश्यकता पडल्यास या मुदतवाढीचा पुढील विस्तारासाठी फेरआढावाही घेतला जाईल. देशांतर्गत स्विचिंग तरतूदही तात्पुरती वाढवली जात आहे. यामुळे युकेमध्ये राहणाऱ्या लोकांना आपले मार्ग स्तर ४ (विद्यार्थी) वरून स्तर २ (साधारण कामगार) असे बदलता येतील. अशा प्रकारे त्यांना त्यांना काम करण्याची गरज असेल तर तेथेच राहता येईल.

भारतातील हंगामी उच्चायुक्त जॉन थॉम्पसन यांनी युकेमध्ये अडकलेल्या अनेक भारतीयांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली. घरी परतू न शकणार्या प्रवाशांना सध्याची स्थिती किती दुःखदायक आहे, याची मला तीव्रतेने जाणीव आहे. या घोषणेमुळे युकेमध्ये असलेल्या अनेक भारतीय नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा आहे. स्वतंत्रपणे, भारतात, माझे कर्मचारी आणि मी भारतातील ब्रिटिश नागरिकांना मदत हवी असेल तर त्यांना ती मिळेल, यासाठी चोविस तास काम करत आहोत, असेही थॉम्पसन म्हणाले. दरम्यान, भारतानेही प्रतिसाद देत देशातील सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी व्हिसाचा कालावधी जाहिर केला आहे. १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत भारताने व्हिसाची मुदत वाढवली आहे. व्हिसाची मुदतवाढ मिळवण्यासाठी परदेशी नागरिकांना परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयात एक अर्ज ऑनलाईन सादर करण्यास सांगितले आहे. १७ मार्चपासून भारताने ३७ देशांच्या नागरिकांना भारतात येण्यास बंदी घातली असून २२ मार्चपासून सर्व व्यावसायिक विमान कार्यचालन थांबवले आहे.

परदेशी दूतावासांची नागरिकांना स्वदेशी परतण्यासाठी मदत..

भारतातील आपल्या नागरिकांना स्वदेशी नेण्यासाठी विमानांची व्यवस्था करणार्या जपान, अमेरिका, जर्मनी, अफगाणिस्तान, रशिया या देशांमध्ये इंग्लडही आहे. इंग्लंडच्या उच्चायुक्तालयाने आपल्या मिशनच्या माध्यमातून ब्रिटिश नागरिकांना त्यांना परत यायचे असेल तर माहिती देण्यास सांगितले असून इंग्लंडमध्ये व्यावसायिक विमाने उपलब्ध होतील याची माहितीही देण्यास सांगितले आहे. भारतातील जर्मन दूतावास दररोज चोविस तास संकट केंद्र चालवत असून युरोपिय महासंघाच्या संपर्कात राहून आणि भारतीय सरकारच्या समन्वयाने आपल्या अडकलेल्या पर्यटकांना परत नेण्यासाठी उड्डाणे आयोजित करत आहे. एक विशेष लुफ्तांसा विमान जर्मन,युरोपिय महासंघ आणि जर्मनीत कायम वास्तव्य असलेल्या काही भारतीयांसह ५०० प्रवाशांना दिल्ली ते फ्रँकफर्ट असे विमान घेऊन गेले. आणखी एक विशेष विमान गुरूवारी रात्री अंदाजे ५०० नागरिकांना घेऊन गेले.

भारतात ५ हजार जर्मन पर्यटक आहेत, असा अंदाज आहे. जर्मन दूतावासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रसारित झालेल्या एका व्हिडिओत, जर्मन राजदूत वॉल्टर लिंडर यांनी ऋषीकेश आणि जयपूरमधून बसमधून परतणार्या जर्मन पर्यटकांच्या ताफ्याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या नागरिकांना दिल्ली विमानतळाच्या जवळच्या हॉटेल्समध्ये रहाण्याचा प्रयत्न करा असे सांगितले असून स्वदेशी जाण्यासाठीच्या विमानासाठी तयार रहा, असेही सांगितले आहे. जर्मन दूतावासाने अतिरिक्त उड्डाणांची परवानगी भारत सरकारकडे मागितली असून त्याच्या प्रतिक्षेत आहेत. तत्पूर्वी ३८८ रशियन नागरिकांना घेऊन दिल्लीहून एक आणि गोव्याहून १२६ प्रवाशांना घेऊन मॉस्कोला विमान गेले आहेत. सध्या मात्र आणखी एखाद्या अशा विमानोड्डाणाची योजना नाही.

दिल्लीतील रशियन दूतावासाने आपल्या तीन वकिलातीच्या माध्यमातून भारतात असलेल्या कित्येक हजार रशियन नागरिकांना संपर्कात राहून परत जाण्याबाबत गरज असेल तर सल्ला मागण्यास सांगितले आहे. अफगाण वकिल ताहिर कादरी यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. भारतातील अफगाणिस्तानचे पर्यटक गुरूवारपासून परत जाऊ शकतील, असे म्हटले होते. भारतात अडकलेल्या सर्व अफगाण नागरिकांना परत नेण्यासाठी प्रस्तावावर जोरदार पाठपुरावा केल्यानंतर भारत सरकार त्यास मान्यता देण्याची शक्यता आहे. आमच्या अडकलेल्या अफगाण नागरिकांनी कामएअरशी उड्डाणाच्या तपशीलाबाबत संपर्क साधावा, असे कादिरी यांनी सांगताना भारताचे आभार मानले आहेत.

- स्मिता शर्मा.

Last Updated : Apr 1, 2020, 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.