लंडन - यूकेमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या 5,587 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह, देशातील एकूण संक्रमण झालेल्यांची एकूण संख्या 42 लाख 91 हजार 271 झाली आहे. अधिकृत आकडेवारीवरून हे उघड झाले आहे.
शनिवारी जाहीर झालेल्या सिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, देशात कोरोनाशी संबंधित 96 नवीन मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कोरोनाच्या संसंर्गामुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या 1 लाख 26 हजार 122 झाली आहे. यामध्ये केवळ अशाच लोकांचा समावेश आहे, ज्यांचा पहिली चाचणी सकारात्मक आल्यानंतर अवघ्या 28 दिवसांत मृत्यू झाला.
हेही वाचा - चीनची लस घेतल्यानंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण
अलीकडील अधिकृत आकडेवारीनुसार, देशातील 26.8 दशलक्षाहूनही अधिक लोकांना कोरोनाविरोधी लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. यूकेमध्ये सलग दुसर्या दिवशी लसीचे 7 लाख 11 हजारपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत.
यूकेमधील अर्ध्याहून अधिक प्रौढांना या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा - दीर्घ आणि आरोग्यसंपन्न जीवन जगायचं आहे? तर 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा