ETV Bharat / international

'अणु तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोट्यवधी डॉलर कमवण्याचा चीनचा डाव'

author img

By

Published : Oct 31, 2020, 6:47 PM IST

अणु तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोट्यवधी डॉलर मिळवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यासाठी चीनने जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. त्यासाठी चीनला फ्रान्सची गरज असल्याने चीन फ्रान्सबाबत अधिक उदार धोरण ठेवतांना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून फ्रँको-चीन द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर चीन भर देत आहे.

nuclear technology news
'अणु तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोट्यावधी डॉलर कमवण्याचा चीनचा डाव'

पॅरिस - अणु तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोट्यवधी डॉलर मिळवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यासाठी चीनने जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. त्यासाठी चीनला फ्रान्सची गरज असल्याने चीन फ्रान्सबाबत अधिक उदार धोरण ठेवताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून फ्रँको-चीन द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर चीन भर देत आहे.चीन फ्रान्सच्या मदतीने अणु तंत्रज्ञान क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करू इच्छितो.अशी माहिती एका अमेरिकन वृत्तसंस्थेने दिली आहे. सोबतच अणु तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगात आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात चीन असल्याचा आरोपही या वृत्तसंस्थेने केला आहे.

पुढे या वृत्तसंस्थेने असेही म्हटले आहे की चीनचे राष्ट्राध्यक्ष अणु उर्जेच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेण्यासाठी उत्सुक आहेत. फ्रान्ससोबत मैत्रीचा हात पुढे करून जास्तीत जास्त फायदा आपल्या पदरात कसा पाडून घेता येईल, यासाठी चीन प्रयत्न करत आहे. चीनकडून सध्या शी जिनपिंग आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घडवून आणण्यासाठी देखील प्रयत्न केले जात असल्याची माहिती या वृत्त संस्थेने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.