सोफिया - बल्गेरियातील राजधानीत एक भयावह घटना घडला आहे. बल्गेरियातील पश्चिम भागात एका महामार्गावर एका बसमध्ये घटनेत 45 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. याशिवाय, आगीत जखमी झालेल्या सात जणांना राजधानी सोफिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गृह मंत्रालयाच्या अग्निसुरक्षा विभागाचे प्रमुख निकोलाई निकोलोवी यांनी याबद्दल माहिती दिली.
दक्षिण युरोपातील बल्गेरियात मंगळवारी सकाळी झालेल्या एका भीषण बस अपघातात किमान 45 जणांचा मृत्यू झाला असून इतर सात जण जखमी झाले आहे.
मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश असून सात जखमींवर नजिकच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
पश्चिम बल्गेरियात मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. ही बस उत्तर मॅसिडोनियातील असल्याचे समजते आहे. मॅसिडोनियाच्या प्रतिनिधींनी रुग्णालयाला भेट देत जखमींची विचारपूस केली.
काळजीवाहू पंतप्रधान स्टिफन यानेव यांनी घटनास्थळाला भेट देत या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.