लंडन - इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहा दिवसांपूर्वी जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर सात दिवसांसाठी ते स्व-विलगीकरणात गेले होते. आज पुन्हा कोरोना चाचणीसाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते.
विलगीकरण काळामध्येदेखील त्यांना कोरोनाची लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे खबरदारी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती एका सरकारी प्रवक्त्याने दिली.
पंतप्रधानांनी यावेळी डॉक्टरांचे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे त्यांच्या कामाबद्दल आभार मानले. तसेच, लोकांनाही त्यांनी घरात राहण्याचे आवाहन केले. त्यांचा सात दिवसांचा विलगीकरण कालावधी शुक्रावारी संपणार होता. मात्र, त्याना कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्यामुळे हा कालावधी वाढवल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
हेही वाचा : कोरोनाचा कहर! केवळ युरोपमध्ये 46 हजार नागरिकांचा मृत्यू...